Join us
Daily Top 2Weekly Top 5

HF Cow : रोज 25 ते 65 लिटर दूध देणाऱ्या गायीने दिला जुळ्या कालवडींना जन्म, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:45 IST

HF Cow : दुग्ध व्यवसायासाठी वरदान एचएफ ही गायीची जात सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून ओळखली जाते.

भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी (दगडी) येथील खरेदी विक्री संघाचे उपसभापती नरेंद्र -झलके यांच्याकडे असलेल्या एचएफ (होल्स्टीन फ्रीजियन) जातीच्या गायीने दोन निरोगी कालवडींना जन्म दिला. एकाच वेळी दोन कालवडींना जन्म देण्याची ही घटना दुर्मीळ मानली जात असल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.

दुग्ध व्यवसायासाठी वरदान एचएफ ही गायीची जात सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून ओळखली जाते. एक गाय दररोज साधारणतः २५ ते ६५ लिटर दूध दररोज देते. भारतात संकरित एचएफ गायीची किंमत ४० हजार ते ८० हजारपर्यंत आहे.

या गायींना विशेष चारा आणि व्यवस्थापनाची गरज असते. त्यातच दोन्ही वासरे ही मादी असल्याने भविष्यात दुग्धव्यवसायासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, गाय आणि दोन्ही वासरे पूर्णपणे सुरक्षित व सुदृढ आहेत.

नवजात कालवडीची (Female Calf) योग्य काळजी घेतल्यास भविष्यात चांगली दुभती गाय तयार होते. जन्मानंतर पहिल्या १ तासात डिंक (Colostrum) पाजणे, नाळ निर्जंतुक करणे, उबदार व स्वच्छ वातावरणात ठेवणे आणि ६ महिन्यांपर्यंत योग्य सकस आहार देणे आवश्यक आहे. यामुळे कालवडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

आमच्या गायीने दोन कालवडींना जन्म दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. दोन्ही वासरे सुदृढ असून, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे.- नरेंद्र झलके, उपसभापती, खरेदी-विक्री संघ, लाखनी

 

 

 

शेळ्यांचे दूध आणि वजन वाढविण्यासाठी 'या' झाडांचा पाला खाऊ घाला, वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : High-Yielding HF Cow Gives Birth to Healthy Twin Female Calves

Web Summary : An HF cow in Bhandara, known for producing 25-65 liters of milk daily, delivered healthy twin female calves. This rare event is significant for dairy farming, as female calves can become high-yielding cows with proper care, including colostrum and a nutritious diet.
टॅग्स :शेती क्षेत्रगायदुग्धव्यवसायशेती