Join us

गायीच्या दूध उत्पादनात भारत एक नंबरवर, दूध उत्पादकांना मोबदला मिळतोय का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:11 IST

Milk Production : दूध उत्पादनात (Milk Production) भारत पहिल्या क्रमांकावर असला तरीही मात्र दूध उत्पादकांच्या पदरात काय पडतंय हे पाहणे गरजेचे आहे. 

Cow Milk Production : आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन (IDF) च्या २०२४ अहवालानुसार, गायीच्या दुधाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होत आहे. गायीच्या दुधाच्या उत्पादनात भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे. दूध उत्पादनात (Milk Production) भारत पहिल्या क्रमांकावर असला तरीही मात्र दूध उत्पादकांच्या पदरात काय पडतंय हे पाहणे गरजेचे आहे. 

जगभरात गायीच्या दुधाला 9Cow Milk) अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाय दूध उत्पादकांची संख्याही भारतात अधिक आहे. त्यामुळे दूध उत्पादन चांगले होते. अलीकडेच, आयडीएफने जागतिक दुग्धशाळा परिस्थिती २०२४ अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात म्हटले आहे की, २०२३ मध्ये भारतात गायीच्या दुधाचे उत्पादन १२.९ कोटी टन होते. 

तथापि, युरोपियन युनियनमध्ये १५.४ कोटी टन गायीचे दूध उत्पादन झाले आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश असल्याने, भारताकडे गायीच्या दुधाचा प्रमुख उत्पादक म्हणून पाहिले जात आहे.  त्याच वेळी, अमेरिकेत हा आकडा १० कोटी टन आहे. तर चीनमध्ये ४२ लाख टन गायीच्या दुधाचे उत्पादन झाले आहे. 

राष्ट्रीय गोकुळ मिशनचे यश राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती, विशेषतः लहान पशुपालकांना लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकारी आकडेवारीवरून असे दिसून येते की २०१३-१४ मध्ये दुधाळ जनावरांची संख्या ८४.०९ दशलक्ष होती. २०२१-२२ मध्ये हा आकडा १२०.१९ दशलक्षवर पोहोचला होता. त्याच वेळी, २०२०-२१ मध्ये गायीचे दूध उत्पादन दशलक्ष टनांपर्यंत वाढले होते, जे २०१४-१५ मध्ये २९.४८ दशलक्ष होते.

दूध उत्पादन चांगले पण दराच काय? एकीकडे भारतात पशुपालकांची संख्या वाढते आहे. दूध उत्पादनात भर पडत आहे. मात्र दूध उत्पादकांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. आजच्या घडीला गायीच्या दुधाला साधारण २० रुपयांपासून ते २७-२८ रुपये भाव मिळत आहे. मात्र यात दुधाचा दर्जा, फॅट, पाणी, snf यावर दर अवलंबून आहे. मात्र एकीकडे दूध उत्पादनात भारताचा एक नंबर असूनही दूध उत्पादकांना मात्र कवडीमोल दरात दूध विक्री करावी लागत आहे.  

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायगायशेती क्षेत्रशेती