Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याचा प्रश्न मिटला, पशुसंवर्धन विभागाकडून वैरण बियाण्यांचे वाटप, कधी आणि कुठे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:35 IST

Vairan Biyane Vatap : पशुधनाच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोफत चारा बियाणे पुरविण्यात येते. 

जळगाव : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात बाजरीचे २ हजार ५८७ तर मक्याचे ३१ हजार ४४ किलो वैरण बियाण्यांचे वाटपाला सुरुवात केली आहे. पशुधनाच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोफत ज्वारी, मका बियाणे पुरविण्यात येते. 

बियाणे १०० टक्के अनुदानावर मिळत असल्याने कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे द्यावे लागत नाही. मागणी अर्ज, सात-बारा उतारा आणि आधार कार्ड ही कागदपत्रे दिल्यानंतर उपलब्ध बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिले जाते. चारा समृद्ध गाव अभियानांतर्गत

अंतर्गत पशुपालकांना वैरण बियाण्यांचा लाभपालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत वाटप करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत वैरण बियाण्यांची किट वाटप केली जाणार आहे. 

पशुसंवर्धन व दुग्ध विकास व्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे.

बाजरी प्रत्येकी १७२ किलोअभियानांतर्गत बाजरीचे तालुकानिहाय प्रत्येकी १७२ किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर जळगाव वगळता अन्य सर्वच तालुक्यांना मक्याचे २०६४ किलो बियाणे उपलब्ध झाले आहे. जळगाव तालुक्यासाठी २१४८ किलो बियाण्याचा लाभ मिळणार आहे.

 

आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे कसं ओळखायचं, पहा ही सोपी ट्रिक

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fodder problem solved: Animal Husbandry distributes seeds; availability details.

Web Summary : The Animal Husbandry Department in Jalgaon is distributing free Bajra and Maize seeds to farmers. Beneficiaries receive seeds upon submitting required documents like application, Aadhar card and land record. The initiative aims to boost livestock development under the 'Fodder Rich Village' campaign, with distribution happening at camps.
टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतीशेतकरी