Join us
Daily Top 2Weekly Top 5

Animal Healthcare :'गोल्डन अवर'मध्ये पशुधनाला जीवदान; १९६२ हेल्पलाईन ठरतेय शेतकऱ्यांची लाईफलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:56 IST

Animal Healthcare : लातूर सह राज्यभरात 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने हजारो पशुधनाला जीवदान मिळत आहे. १९६२ हेल्पलाईन आणि मोबाइल वेटरनरी क्लिनिकच्या मदतीने डॉक्टर अवघ्या दीड तासात गोठ्यापर्यंत पोहोचत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.(Animal Healthcare)

हरी मोकाशे 

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुधन आजारी पडल्यावर किंवा आपत्कालीन स्थितीत वेळेवर उपचार मिळणे कठीण ठरत असताना, पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेल्या १९६२ हेल्पलाईनमुळे हजारो पशुधनांचे प्राण वाचत आहेत. (Animal Healthcare)  

गेल्या वर्षभरात राज्यभरात तब्बल ६४,७५९ पशुधनाला 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे.(Animal Healthcare)  

'गोल्डन अवर'मध्ये उपचार; जीव वाचवण्याचे प्रमाण वाढले

पशुधनाच्या आरोग्याशी शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा थेट संबंध असतो. जनावर आजारी पडल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका बसतो. अशा वेळी १९६२ हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचते, ही या योजनेची मोठी जमेची बाजू ठरत आहे.

या जलद प्रतिसादामुळे २९,१३० मोठे आणि ३५,५६९ लहान पशुधन वाचवण्यात यश आले आहे.

लाखो कॉल्स, हजारो तक्रारींचे निवारण

राज्यात या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एकूण कॉल्स: ४,०१,९९२

तक्रारींचे निवारण: ३,७८,०००

दुर्गम भागातील लाभार्थी: ३४,९७९ पशुपालक

या आकडेवारीवरून ग्रामीण भागात या सेवेचे महत्त्व अधोरेखित होते.

१५३ मोबाइल वेटरनरी क्लिनिकची मदत

राज्यात सध्या १५३ मोबाइल वेटरनरी क्लिनिक कार्यरत आहेत. या क्लिनिकमुळे पशुपालकांना दवाखान्यात जनावर नेण्याची गरज कमी झाली असून घरपोच उपचार सेवा उपलब्ध झाली आहे. 

अपघात, विषबाधा, कठीण प्रसूती अशा गंभीर परिस्थितीतही तत्काळ उपचार मिळत आहेत.

'AI' तंत्रज्ञानाची जोड

सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कॉल सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 'AI'च्या मदतीने आता पशुपालकांना प्रथमोपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती काही सेकंदात मिळणार आहे. यामुळे पशुधनाची हानी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय उपचारांची स्थिती

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

नांदेड – ३,९३८

छत्रपती संभाजीनगर – ३,७४३

लातूर – २,४४६

बीड – १,५७७

जालना – १,३६२

परभणी – १,०५७

हिंगोली – ८२४

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

या उपक्रमामुळे दुग्धव्यवसाय आणि पशुपालन अधिक सुरक्षित आणि फायदेशीर बनत आहे. पशुधनाचे जीव वाचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळत आहे.

१९६२ हेल्पलाईन आणि मोबाइल वेटरनरी क्लिनिक ही योजना पशुपालकांसाठी 'लाईफलाइन' ठरत आहे. 

वेळेवर उपचार, तंत्रज्ञानाची साथ आणि घरपोच सेवा यामुळे पशुधनाचे संरक्षण होत असून, भविष्यात ही सेवा आणखी प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Leopard Attack Protection : वाघ-बिबट्यांपासून बचावासाठी नवी टेक्नॉलॉजी; कशी काम करते? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Animal Healthcare : पशुपालकांसाठी मोठी खुशखबर; आता मिळणार 'डबल' सुविधा!

English
हिंदी सारांश
Web Title : Doctors Raced to Barns: 65,000 Livestock Saved in a Year

Web Summary : Maharashtra's 1962 helpline saved 64,759 livestock lives. Veterinary teams reach farmers within 1.5 hours, offering crucial, timely treatment. This initiative strengthens rural economies.
टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीशेतकरीशेती