नाशिक : पशुखाद्य, हिरवा चाऱ्याच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे शेतकरी व पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले असून या दरवाढीचा फटका शेतकरी वर्गाच्या उत्पन्नावर होत आहे.
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र यंदा दुधाच्या उत्पादनखर्चात मोठी वाढ झाल्याने हा व्यवसाय तोट्यात सुरु आहे. सध्या मका व उसाचा हिरवा चारा परिसरात पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिटन या दराने मिळत आहे.
याशिवाय पूर्वी ५० किलोला १,७०० रुपयांना मिळणारे सरकी पेंड आता १,९५० ते २,००० रुपये दरम्यान विकले जात आहे. एकीकडे पशुखाद्य व चाऱ्याचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे दुधाच्या दरात मात्र सातत्याने कपात होत आहे. ग्रामीण भागातील दूध डेअऱ्यांमध्ये सध्या दुधाचा दर केवळ ३४ ते ३५ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. त्यामुळे वाढता खर्च आणि मिळणारा अल्प दर यामध्ये ताळमेळ राहिलेला नाही.
मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी शेतीला आधार मिळावा म्हणून स्वतःच्या बचतीतून, मात्र सद्यस्थितीत जनावरे विकताही येईना आणि ठेवताही येईना अशी बिकट अवस्था निर्माण झाली असून पशुपालक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
पर्यायी खाद्यांकडे कलपशुखाद्याचे दर परवडत नसतानाही चांगल्या प्रतीचे दूध मिळावे म्हणून शेतकरी अधिक खर्च सहन करून जनावरांना पोषक खाद्य देत आहेत. दरवाढीमुळे अनेक पशुपालकांनी पर्यायी खाद्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
आर्थिक मदतीची मागणीशेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे पशुखाद्य, सुतळीच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादनखर्च प्रचंड वाढत आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी व पशुपालक आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढावा, पशुखाद्य व सुतळीच्या दरांवर नियंत्रण आणावे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
४० ते ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. सरकी पेंड प्रति ५० किलो बॅग १९५० ते २००० रुपये किमतीला मिळत आहे. दर वाढल्याने पशुखाद्याचा खर्च, मिळणारा भाव यात ताळमेळ बसत नाही. शासनाने पशुखाद्य, खते, सुतळी यांच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण लावावे.- अनिल भोर, शेतकरी, चांदोरी.
Web Summary : Soaring cattle feed costs are crippling farmers. Milk production expenses are up, while milk prices fall. Farmers request financial help amid rising fodder and input costs.
Web Summary : पशु आहार की बढ़ती कीमतें किसानों को पंगु बना रही हैं। दूध उत्पादन खर्च बढ़ गया है, जबकि दूध की कीमतें गिर रही हैं। किसान बढ़ते चारे और इनपुट लागत के बीच वित्तीय सहायता का अनुरोध करते हैं।