Join us

Agriculture News : नाशिक जिल्हा परिषदेकडून 'ई पशु' ॲपची निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्ये? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:43 IST

Agriculture News : जिल्हा परिषद नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाने 'ई पशु' ॲपची निर्मिती केली आहे.

नाशिक : जिल्हा परिषद नाशिकच्यापशुसंवर्धन विभागाने (Nashik ZP Animal Husbundry) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पशुवैद्यकिय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी 'ई पशु' ॲपची निर्मिती केली असून जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले.  

सदरचे ॲप पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांसाठी, पशुपालक व विभाग प्रमुखांसाठी उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्याबरोबरच पशुंमध्ये आजारांचे प्रमाण आणि रोगप्रसारावर वेळीच नियंत्रण ठेवता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) एकूण २४४ पशुवैद्यकिय संस्था कार्यरत असून, या ॲपच्या (E Pashu App) मदतीने त्यांच्या दैनंदीन सेवांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार आहे. विविध प्रकारचे उपचार, औषधोपचार, लसीकरण आणि पशुरुग्ण सेवा याद्वारे अद्ययावत नोंदविली जाईल. तसेच, उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधसाठ्याचा तपशीलही या ॲपमध्ये ठेवता येणार आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ई पशु ॲपमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतीमान होणार असून पेपरलेस कामकाजामुळे वेळेची बचत होऊन तांत्रिक कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळता येणार असल्याचे सांगत पशुंच्या कल्याणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे नमूद केले. 

मिशन कामधेनू योजना तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकिय दवाखान्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र 'मिशन कामधेनू' योजना सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात 60 दवाखान्यांचे नूतनीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अर्जुन गुंडे यांनी पशुसेवेचे महत्त्व स्पष्ट करत ई पशु ॲपमुळे ही सेवा अधिक सोपी आणि जलद होईल असे मत व्यक्त केले. 

Animal Disease : जाणून घ्या जनावरांमध्ये मुतखडा आजार कसा होतो? त्यावर उपाय काय?

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायनाशिक