Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यात 125 म्हशी, रोजचे सहाशे ते सातशे लिटर दूध, 42 हजारांचे उत्पन्न, दूध व्यावसायिकाची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:42 IST

Milk Business : शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळले असुन त्यांना त्याचा लाभ होत आहे.

नाशिक : जिल्ह्यात दुग्धव्यवसायशेतीला जोड धंदा म्हणून समजला जाणारा वृद्धिंगत झाला आहे. जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायात अग्रेसर असलेल्या सिन्नर तालुक्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय नाही तर दुग्ध व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेती असे नवीन समीकरण ओळखले जाऊ लागले असून, एकटचा सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातून २ लाख ३५ हजार लिटर दूध रोजचे संकलित होत आहे.

गोठ्यात जनावरे सांभाळायची ही गोष्ट शेतकऱ्यांकडे असायची मात्र कालांतराने शेतीतून निघणारे अल्प उत्पन्न व त्याचा ताळेबंद बसत नसल्याने शेतकरी वर्गाने दुग्ध व्यवसायाला पसंती दिली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ओळखला जाऊ लागला. दुग्ध व्यवसायातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत गेले.

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. सिन्नर तालुक्यामध्ये आजमितीला शेकडो दूध संकलन केंद्र आहे. यातून दर दिवशी २ लाख ३५ हजार ८०८ लिटर दुधाचे संकलन होते. तर त्यापाठोपाठ निफाड तालुक्यातून २ लाख १९ हजार २९२ लिटर दूध संकलन होते. या व्यवसायाला शेतकरी वर्गातुन पसंती दिली जात असुन जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळले असुन त्यांना त्याचा लाभ होत आहे.

शेतीला मुबलक पाणी नसल्याने या व्यवसायाकडे वळलो आहे. माझ्या गोठ्यात एकूण १२५ म्हैस आहे. पाण्याचे प्रमाण अल्प असल्याने होईल तितका चारा शेतात पिकावला जातो. काही चारा विकतचा घेऊन हा व्यवसाय शेतीपेक्षा अधिक उत्पन्न देतो. रोजचे सहाशे ते सातशे लिटर दूध निघते. यातून ४२ हजार रुपये उत्पन्न मिळते.- दीपक थोरात, पशुपालक पंचांळे, ता. सिन्नर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुग्ध व्यवसाय केला जातो. यात सिन्नर, निफाड तालुका अग्रेसर आहे. काही तालुक्यात अल्प प्रमाणात दुधाचे संकलन रोजचे होत असते पूर्वी दुधाला २७ ते २८ रुपये प्रतिलिटर दर होता. आता दुधाला ४० रुपयांपर्यंत प्रतिलिटर दर मिळतो.- आर. वाय. नागरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, नाशिक

 

 

ट्रॅक्टर, हार्वेस्टरसह विविध कृषी अवजारांना किती अनुदान मिळते, अर्ज कुठे करायचा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik dairy farmer earns ₹42,000 from 125 buffaloes' milk.

Web Summary : In Nashik, dairy farming thrives as a profitable venture, with Sinnar leading milk production. Deepak Thorat, a farmer, earns ₹42,000 daily from 125 buffaloes producing 600-700 liters of milk, highlighting the financial benefits of dairy over traditional farming.
टॅग्स :दुग्धव्यवसायदूधव्यवसायशेती क्षेत्रशेतीनाशिक