Join us

तुमच्या जनावरांची संपूर्ण माहिती ठेवा आता मोबाइलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:06 IST

केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून संकलित केली जाणार असून त्या जनावरांचे टॅगींगही केले जाणार आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून संकलित केली जाणार असून त्या जनावरांचे टॅगींगही केले जाणार आहे. त्याचबरोबर 'ई-गोपाल अॅप' वर पशुपालकांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.

नोंद नसेल तर लाभ मिळणार नाहीया अॅपद्वारे नोंद केल्याने देशात नेमके किती जनावरे आहेत, याची माहिती एकत्रित मिळू शकते. सरकारला कोणतीही योजना राबवायची झाल्यास या आकडेवारीची मदत होणार आहे. यासाठी ही सक्ती आहे, नोंद नसेल तर शासकीय लाभ मिळणार नाही.

अलर्ट मेसेजमधून कळणार लसीकरणाची माहितीअलर्ट पर्यायामध्ये पशुपालक आपल्या पशुंच्या लसीकरणाविषयी माहिती मिळवू शकतील. लसीकरण कॅम्प कुठे सुरू आहे, याची माहिती आपल्याला यातून मिळेल. कृत्रिम गर्भधारणा पद्धती आणि चांगल्या जातीच्या जनावरांचे वीर्य सीमेन विक्रीची माहिती पशुपालकांना यातून मिळणार आहे

'इनाफ'द्वारे १० लाख जनावरांची नोंदणीयापूर्वी 'इनाफ' प्रणालीद्वारे जनावरांची माहिती संकलित केलेली आहे. त्यामध्ये सर्व प्रवर्गातील १० लाख जनावरांची नोंदणी झालेली आहे.

जनावरांचे आधार कार्ड तयार होणारयाद्वारे प्रत्येक जनावरांचे टैंगिग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनावरांना क्रमांक मिळणार आहे, माणसाप्रमाणे त्याचेही आधारकार्ड तयार होणार आहे. जनावरांचा क्रमांक टाकला की त्याची सगळी कुंडली समोर येणार आहे. त्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

ही आहेत या अॅपची वैशिष्ट्येयात कृत्रिम गर्भधारण, पशूची प्राथमिक चिकित्सा, लसीकरण, उपचार आणि पशूपोषण आदी विषयांची माहिती या अॅपमधून मिळते. याशिवाय शेतकऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहितीही या अॅपमधून मिळणार आहे. हे अॅप पशुपालकांसाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणार आहे.

आपल्या गोठ्यातील जनावरांची या अॅपद्वारे नोंदणी केल्यास त्याचे फायदे अनेक आहेत. आपल्या जनावरांची सगळी माहिती एकत्रित राहणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ती उपयुक्त असल्याने पशुपालकांनी जास्ती जास्त नोंदणी करावी. - डॉ. प्रमोद बाबर (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद)

टॅग्स :शेतकरीगायसरकारसरकारी योजनाराज्य सरकारमोबाइल