Join us

पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना कशी मिळते सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 9:43 AM

पशुवैद्यकीय सेवा पुरवणारी मुख्य संस्था म्हणजे 'पशुवैद्यकीय दवाखाना. जिल्ह्यातील त्याचा इतिहास जो जुन्या पशुवैद्यकाकडून समजला तो म्हणजे जिल्ह्यातील पहिला पशुवैद्यकीय दवाखाना हा रिसाला रोडवरील राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शेजारी, राजवाड्याच्या पाठीमागे असणारा दवाखाना.

पशुवैद्यकीय सेवा पुरवणारी मुख्य संस्था म्हणजे 'पशुवैद्यकीय दवाखाना. जिल्ह्यातील त्याचा इतिहास जो जुन्या पशुवैद्यकाकडून समजला तो म्हणजे जिल्ह्यातील पहिला पशुवैद्यकीय दवाखाना हा रिसाला रोडवरील राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शेजारी, राजवाड्याच्या पाठीमागे असणारा दवाखाना.. हा दवाखाना संस्थान काळात स्थापन केला होता. पुढे राज्य शासनाने त्याचे रूपांतर सुसज्ज अशा तालुका लघु पशुचिकित्सालयात केले आहे. ही संस्था आज शहरासाठी पशुवैद्यकीय सेवा पुरवत आहे. पूर्वीच्या काळी या दवाखान्यातील पशुवैद्यकांना मुख्यत्वे करून सांगली संस्थानकडे असणारे घोडे, शहर व जिल्ह्यातील पशुधन आणि श्रीपांजरपोळ संस्था सांगली अशा ठिकाणी असणाऱ्या पशुधनास पशुवैद्यकीय सेवा पुरवत असे.

दक्षिण सातारा नावाने ओळखला जाणारा हा जिल्हा १९६१ पासून स्वतंत्रपणे सांगली जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी जिल्ह्यात एकूण १० पशुवैद्यकीय दवाखाने आणि २४ पशुवैद्यकीय मदत केंद्रे अशा एकूण ३४ संस्थांद्वारे पशुवैद्यकीय सेवा देण्यात येत होती. आज जिल्ह्याचा झालेला विकास, वाढलेली सिंचन सुविधा, दळणवळण व सहकार यामुळे वाढलेल्या पशुधनास सेवा पुरवण्यासाठी एकूण १५७ संस्था जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील एकूण कुक्कुट पक्ष्यांसह असणाऱ्या ५१ लाख २५ हजार ४०२ पशुधनास पशुआरोग्य सेवा पुरवत आहे.

अधिक वाचा: कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?

या १५७ संस्थांमध्ये एक जिल्हास्तरीय जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय मिरज, पाच तालुका लघु पशुचिकित्सालये, सात राज्यस्तरीय श्रेणी एक दवाखाने, ७६ जिल्हा परिषद स्तरीय श्रेणी एक दवाखाने सोबत ३८ राज्यस्तरीय श्रेणी दोन दवाखाने व २६ जिल्हा परिषद स्तरीय श्रेणी दोन दवाखाने, असे एकूण राज्यस्तरीय ५५ व जिल्हा परिषद स्तरावर १०२ संस्था कार्यरत आहेत. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत जत, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ या ठिकाणी चार फिरते पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यांचाही समावेश यामध्ये आहे.

या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी सुसज्ज अशी व्हॅन असून, त्या ठिकाणी बाह्य स्रोतांद्वारे भरलेले सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी हे काम पाहतात. इतर श्रेणी एक दवाखान्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अधिकारी पशुधन विकास अधिकारी व श्रेणी दोन दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक हे कामकाज पाहतात. जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व राज्यस्तर व जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संस्थांसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांचे कार्यालय मिरज येथे आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय सेवा हाताळते.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहायक आयुक्त्त, पशुसंवर्धन विभाग

टॅग्स :गायदुग्धव्यवसायऔषधंसरकारराज्य सरकारसांगली