Join us

Goat Market : बकरी ईद निमित्त शेळ्यांचा बाजार चार दिवस सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:27 IST

bakri id goat market मुस्लिम समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण बकरी ईद जवळ आला आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो.

चाकण : मुस्लिम समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण बकरी ईद जवळ आला आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो.

'बकरी ईद' म्हणजे ईद-उल-अधा हा त्यागाचा सण म्हणून मुस्लिम बांधव मोठ्या उत्सवात साजरा करतात. यासाठी चाकण (ता. खेड) येथे चार दिवस बकरी बाजार भरवला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बकरी बाजार खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील शेळी-मेंढी बाजारात बुधवार (५) ते शनिवार (दि.७) सलग चार दिवस हा बकरी बाजार भरवण्यात आला आहे.

चाकण येथे गेल्या अनेक वर्षांपासून आठवड्यातील शनिवारी बारामाही बकरी बाजार भरतो. मात्र पहिल्यांदाच सलग चार दिवस बकरी ईद निमित्ताने सुरू केला आहे. बाजार समितीच्या वतीने स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, अल्पदरात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. 

बकरी ईदच्या सणानिमित्ताने बाजार समितीच्या इतिहास पहिल्यांदाच सलग चार दिवस बकरी बाजार भरवला आहे. इतर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना सोईचे व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे. जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होऊन बाजार समितीला लाखोंचा फायदा होईल. - विजयसिंह शिंदे, सभापती

अधिक वाचा: जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय?

टॅग्स :शेळीपालनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचाकणबकरी ईदबकरी ईद