Join us

शेतकऱ्यांना 'या' योजनेअंतर्गत मिळणार २० शेळ्या आणि दोन बोकडांसाठी ५०% अनुदान

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 24, 2023 5:00 PM

मराठवाडा पॅकेज धरतीवर महाराष्ट्र शासनाच्या शेळीपालन अनुदान योजना 2023  अंतर्गत शेतकऱ्यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड यासाठी ५०% अनुदान मिळणार ...

मराठवाडा पॅकेज धरतीवर महाराष्ट्र शासनाच्या शेळीपालन अनुदान योजना 2023  अंतर्गत शेतकऱ्यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड यासाठी ५०% अनुदान मिळणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदीया आणि सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा अशा 7 जिल्ह्यांसाठी हे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. याची प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांना गटानुसार शेळ्या अनुदानावर दिल्या जाणार आहेत. गटानुसार अपेक्षित खर्च हा 2 लाख 31 हजार 400 रुपये इतका असणार आहे.

शेतकऱ्यांना यासाठी शेळी गटाची स्थापना करावी लागते. त्यानंतर शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी वित्तीय संस्थांमधून 50 टक्के निधी कर्ज स्वरूपात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर शासनामार्फत प्रत्येक कर्ज रकमेवर एक लाख 15 हजार याप्रमाणे अनुदान दिले जाते. ४ जुलै पर्यंत अर्जाची मुदत आहे. 

योजनेचे स्वरूप काय?

  • या योजनेअंतर्गत एका शेळी गट वाटपाची रक्कम 2 लाख 31 हजार रुपये असणार आहे.
  • सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान म्हणजेच रुपये 1 लाख 15 हजार 700 रुपये लाभार्थ्याला मिळणार आहेत.
  • ही रक्कम एकदाच मिळणार नसून हे अनुदान गटवाटप स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25% व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 योजनेत सहभागी होण्याच्या अटी

  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. 
  • या योजनेअंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौरस फूट स्वतःची जमीन किंवा जागा लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.

कसा कराल अर्ज?

ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांना अर्ज करण्याच्या सूचना शासनामार्फत देण्यात आल्या आहे. या योजनेच्या अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती मध्ये भरावी लागणार आहेत. अर्ज व कागदपत्रे 5 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत भरून पंचायत समितीमध्ये जमा करावे लागणार आहेत.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेती क्षेत्रमहाराष्ट्रमराठवाडा