Join us

Dairy Subsidy शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर मिळणार दुधाळ गाय, म्हैस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 1:06 PM

जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जाते.

जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येतात. ज्यामध्ये गाय गटासाठी ७५ टक्के म्हणजेच १,१७,६३८ रुपये किंवा म्हैस गटासाठी रुपये १,३४,४४३ अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानापर्यंत दुधाळ जनावरांचे वाटप पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येते. त्याचा फायदा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे.

पात्रतेचे निकष■ लाभार्थी अनुसूचित जाती किवा जमातीतील असावा.■ दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य.■ अत्यल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार असावा.

ऑनलाइन अर्ज करावाया योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतो, महाबीएमएस या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावयाचा असतो. त्यांनतर पात्र उमेदवारांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येते.

अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधू शकता.

अधिक वाचा: दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ

टॅग्स :दुग्धव्यवसायगायजिल्हा परिषदसरकारसरकारी योजनाराज्य सरकार