Animal Care Tips : परभणी शहरासह जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे या दिवसांत जनावरांची विशेषतः दुधाळ जनावरांची अधिक काळजी (Protect animals) घ्यावी लागत आहे. (Animal Care Tips)
यासाठी पशुपालक विविध उपायोजना करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीही पशुपालकांनी जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे. (Animal Care Tips)
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहेत. परिणामी सकाळपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसत आहे. (Animal Care Tips)
उन्हामुळे आजारी पडण्याचा धोका
दुभत्या जनावरांना दूधनिर्मिती करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. यासाठी पशुपालकांकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. (Protect animals)
ग्रीन नेट, गोणपाट, गवताचे अच्छादन
* वाढत्या तापमानातही दुधातील फॅट, एसएनएफ, साखर, प्रथिने आदींची पातळी संतुलित राहावी, दुधाची पत कायम राहावी, यासाठी उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
* ग्रीन नेट, गोणपाट, गोठ्यावर कडबा, गवताचे अच्छादन करून उन्हापासून जनावरांचे संरक्षण केले जात आहे. जनावरांच्या पाठीवर ओला कपडा टाकत असल्याने जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलन राहण्यास मदत होत आहे.
मुबलक हिरवा चारा, पाणी व्यवस्था
* उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी आणि तहान जास्त लागते. त्यामुळे गुरांना जास्तीत जास्त हिरवा चारा खाण्यास द्यावा, मुबलक पाणी पिण्यास द्यावे. साधारण दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे.
* जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते. पशुपालकांनी जनावरांच्या संरक्षणासाठी विविध उपायोजना केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या पाऱ्यात वाढ
शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यामुळे मानवी आरोग्याप्रमाणेच जनावराचेही आरोग्य बिघडत आहे. वाढत्या उन्हापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.