Join us

पशुसंवर्धन विभागात ५५० अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या; हा पॅटर्न कायम ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:39 IST

पशुसंवर्धन विभागात आता समुपदेशनाने बदल्या झाल्या आहेत. यातून अधिकाऱ्यांना समान अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही.

पशुसंवर्धन विभागात आता समुपदेशनाने बदल्या झाल्या आहेत. यातून अधिकाऱ्यांना समान अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही.

तसेच बदल्यांचा हा पॅटर्न कायम ठेवणार आहे. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून सुमारे ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी दुर्गम आदिवासी भागात बदली मागितली होती, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्रीपंकजा मुंडे यांनी दिली.

हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी काही योजना आणू, असेही त्या बोलल्या.

पुण्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यास गुरुवारी (दि. १५) सुरुवात झाली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने करण्यात येत आहेत. विभागातील वर्ग एकच्या बदल्यांसाठी गुरुवारी समुपदेशन घेण्यात आले. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने आणि सरकारच्या धोरणानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला होता.

यामध्ये प्रथम दिव्यांग, असक्षम पाल्यांचे पालक, दुर्धर आजार, विधवा, परितक्त्या, पती-पत्नी एकत्रीकरण, आई-वडील, सासू-सासरे यांचे आजारपण, असे प्राधान्यक्रम ठरविण्यात आले होते. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून सुमारे ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

पशुसंवर्धन हा विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडित विभाग आहे. तसेच हा विभाग उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो.

मात्र, तरीही हा विभाग जरासा दुर्लक्षित असून विभाग जास्तीतजास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच योजना आणणार आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, त्यांनाही योजना आवडलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात योजना जाहीर करू.

हवी ती पोस्टींग मिळाली, अधिकारी खूश!समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही आजपासून सुरू झाली असून उद्याही म्हणजे १६ मे रोजी ही कार्यवाही सुरू असणार आहे. आज आदिवासी व नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रात असलेल्या ११८ आणि बिगर अवघड क्षेत्रात असलेल्या ४४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या. मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनाप्रमाणे आणि सहजतेने हवी ती पोस्टींग मिळाल्याने अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खूप चांगला निर्णय - डॉ. आकाश ठाकरेमी यवतमाळ जिल्ह्यातील आहे, माझी पहिली पोस्टींग २०२२ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे झाली. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष सेवा दिली. आता समुपदेशनाने मला माझा जिल्हा मिळाला. मला खूप आनंद झाला. मंत्री मुंडे यांनी घेतलेला निर्णय आमच्या सारख्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविणारा आहे.

डॉ. प्रियंका स्वामीदासमी सिरोंचा तालुक्यात कार्यरत होते. हा भाग तेलंगणा सीमेवर असल्याने इथे मराठीपेक्षा तेलगू बोलली जाते. मला तेलगू भाषा येते.खेड्यातील लोकांशी चांगला संवाद साधता येतो. लोकं म्हणाले तुमची बदली झाल्यावर आमचे कसे होईल? आता समुपदेशनाने मी इथेच राहिले. हवे असलेले ठिकाणी मिळाल्याने मी खूश आहे. खरचं हा निर्णय ऐतिहासिक आहे. मंत्री मुंडे यांचे खूप खूप आभार!

अधिक वाचा: जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखाल? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायराज्य सरकारसरकारमंत्रीपंकजा मुंडे