Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > Agro Tourism : कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? सुरूवात कशी झाली आणि इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर!

Agro Tourism : कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? सुरूवात कशी झाली आणि इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर!

What exactly is agri tourism? How did it start and what is its history? Find out in detail! | Agro Tourism : कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? सुरूवात कशी झाली आणि इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर!

Agro Tourism : कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? सुरूवात कशी झाली आणि इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर!

ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आणि ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांना रोजगाराच्या संधी देणे या उद्दिष्टांसह नवीन कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली.

ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आणि ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांना रोजगाराच्या संधी देणे या उद्दिष्टांसह नवीन कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली.

शेअर :

Join us
Join usNext

Agri Tourism : राज्यातील सुमारे 55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलांबून आहेत.  शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास निश्चितच शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पादनाचा मार्ग निर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनामुळे आर्थिक चालना मिळू शकते. कृषी पर्यटनाचा प्रमुख उद्देश, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे, शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनशैलीचा व शेतीचा अनुभव देणे, स्थानिक युवकांना व ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

भारतातमध्ये खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनाची सुरवात कृषी रत्न चंद्रशेखर हरी भडसावळे यांनी केली. ते  "सगुणा रुरल फाउंडेशन (एसआरएफ)" च्या मार्फत शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. या संस्थेचे  मुख्य ध्येय ग्रामीण भारताचा विकास करणे आहे. मला अजून हि आठवतेय मी जेव्हा माझे  कृषीचे शिक्षण घेत होते तेव्हा आमच्या कॉलेजची ट्रिप सगुणा बागेत गेली होती.

तेथील सगळे वातावरण बगुन मी पूर्णपणे भारावून गेली होते.  म्हशीवर बसून फेरी मारणे हे सगळ्यात भारी वाटले होते. आता खूप सारे चांगले बदल येथे झाले आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. सांगण्याच्या उद्देश हा कि, आपल्याकडे खऱ्या अर्थाने १९८५ पासून कृषी पर्यटनाची सुरूवात सगुणा बागेपासून झाली.

त्याच्यानंतर, पांडुरंग तावरे यांनी स्थापन केलेला कृषी पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) सध्या कृषी पर्यटनामध्ये कौतुकास्पद काम करत आहेत, त्यांनी भारतातील कृषी पर्यटनाला जागतिक दर्जा दिला. एटीडीसीने २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन विस्तार योजनेद्वारे सुरू केलेल्या प्रशिक्षण आणि कौशल्य-निर्मिती उपक्रमांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

पुढे जाऊन, महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ लिमिटेड (MART)हि संस्था देखील शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासाठी मार्गदर्शन करू लागली. या संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट नियोजन, विपणन, वित्तपुरवठा आणि इतर राज्य आणि केंद्रीय संस्थांशी संवाद साधणे आहे. बाळासाहेब बराटे यांनी  या संस्थेमार्फत कृषी पर्यटनासाठी मोलाचे कार्य केले आहे.

ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आणि ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांना रोजगाराच्या संधी देणे या उद्दिष्टांसह नवीन कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली.

वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, संशोधन सुविधा, संस्था आणि विद्यापीठे कृषी पर्यटन केंद्रे स्थापन करू शकतात. पर्यटन संस्था या केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र जारी करेल आणि ते बँक कर्जासाठी अर्ज करण्यास देखील पात्र असतील.राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना येथील संस्कृतीची माहिती व्हावी, तसेच उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून नोंदणी करुन कृषी आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी हातभार लावावा.

कृषी पर्यटनाची म्हणजे नेमकं काय? 
कृषी पर्यटन हा एक प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे जो कृषी उत्पादन आणि कृषी पूरक व्यवसाय यांना पर्यटनाशी जोडतो. जेणेकरून पर्यटकांना शेती, पशुपालन किंवा इतर कृषी व्यवसायात आकर्षित करता येईल व त्यांच्यामधून पर्यटकांचे मनोरंजन किंवा नवीन शिकायला मिळेल. सर्वाथाने आपल्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन मार्ग निर्माण होईल.

कृषी पर्यटन हे सामान्य पर्यटनाच्या तुलनेमध्ये थोडी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. हा शेतीपूरक असा व्यवसाय असून, सामान्य हॉटेलिंग किंवा मनोरंजन पार्कच्या तुलनेमध्ये त्यांचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यामध्ये शेतीवर आधारित कोणत्याही उपक्रमांचा समावेश असतो ज्यामुळे पर्यटकांना शेतात, मळ्यांमध्ये किंवा पशुपालनांमध्ये आणले जाते .

या चार गोष्टीशिवाय कोणतीही कृषी पर्यटन पूर्ण होऊ शकत नाही 
१. कृषी उपक्रम आणि पर्यटन उद्योग यांचे एकात्मिक मिश्रण.
२. लोकांना कृषी पद्धतींना भेट देण्यासाठी आकर्षित करण्यासाठी  वेगवेगळॆ नाविन्यपूर्ण गोष्टी.
३. शेतीचे एकूण उत्पन्न वाढवण्याचा प्रामाणिक हेतू 
४. नैसर्गिक वातावरणात येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजन, आनंद, मनःशांती आणि शैक्षणिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याची तयारी.

आता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कृषी पर्यटनाची मार्केटिंग कशी आहे यावर सगळे यश अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेतावरील काम करत करत पर्यटन करणे अपेक्षित आहे. कृषी पर्यटनामध्ये ८० टक्के शेतीवर भर देणे आवश्यक आहे व २० टक्के पर्यटनावर भर देणे गरजेजेच आहे.आणि आपले कृषी पर्यटक धारक भरमसाठ पैसा कृषी पर्यटनातील अनावश्यक बाबीवर (वॉटर ऍक्टिव्हिटीएस, स्विमिंग पूल व रेन डान्स इ.) घालून शेतीकडे दुर्लक्षित करत आहेत. कृषी पर्यटनाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्व कृषी पर्यटक धारकाची आहे. 

- डॉ. प्रतिभा गलांडे-मोरे (पीएचडी - कृषी पर्यटन)
ई-मेल – pratibha.galande@gmail.com

Web Title: What exactly is agri tourism? How did it start and what is its history? Find out in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.