Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > तुमचं गावही होऊ शकतं 'बेस्ट टुरिझम व्हिलेज', इथे करा अर्ज

तुमचं गावही होऊ शकतं 'बेस्ट टुरिझम व्हिलेज', इथे करा अर्ज

Latest News Organization of "Tourism Village competition, see details | तुमचं गावही होऊ शकतं 'बेस्ट टुरिझम व्हिलेज', इथे करा अर्ज

तुमचं गावही होऊ शकतं 'बेस्ट टुरिझम व्हिलेज', इथे करा अर्ज

पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी "बेस्ट टुरिझम व्हिलेज" स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी "बेस्ट टुरिझम व्हिलेज" स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पर्यटन मंत्रालय, भारत सरकार मार्फत पर्यटनाला चालना, स्थानिकांचा सहभाग, ग्रामीण पर्यटन स्थळांचा विकास, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा आयोजित करते. राज्यातील पाटगाव, जि. कोल्हापूर या गावास सन-2023 करीता बेस्ट टुरिझम व्हिलेज (Bronze Category) चे नामांकन मिळाले आहे. मागील वर्षी स्पर्धेला मिळालेला प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी देखील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जतन करणाऱ्या गावांचा पुरस्कार करण्यासाठी आणि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी "बेस्ट टुरिझम व्हिलेज" स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.


ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांचा विकास. 


आर्थिक-सामाजिक, व्यावसायिक कौशल्य विकास, डिजिटलायझेशन ह्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे सक्षमीकरण करणे. ग्रामीण भागात संपर्क व्यवस्था, पायाभूत सुविधा, आर्थिक गुंतवणूक वाढवणे. ग्रामीण भागात पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करणे. शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांचे संरक्षण वाढवणे. ग्रामीण भागातील संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी टिकाऊ पद्धतींना प्रोत्साहन देणे.


बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धेसाठी पात्रता निकष
प्रसिद्ध ठिकाणे, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाजवळ असलेले असे गाव ज्याची लोकसंख्या २५,००० पेक्षा कमी असेल. पारंपारिक शेती, हस्तकला, ग्रामीण खाद्य संस्कृती, सांस्कृतिक वारसा ह्यावर आधारित जीवनशैली असलेली गावे आपला सहभाग नोंदवू शकतात.
मूल्यांकनाचे निकष
सांस्कृतिक आणि नैसर्गिक संसाधने, आर्थिक शाश्वतता, पर्यावरणीय शाश्वतता, पर्यटनाचे प्रशासन आणि प्राधान्यक्रम, आरोग्य, सुरक्षितता आणि सुरक्षासांस्कृतिक संसाधनांचे संवर्धन आणि संवर्धन, सामाजिक शाश्वतता, पर्यटन विकास, पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था.
Best Tourism Village - Heritage
गावात किमान एक वारसा पर्यटन स्थळ असावे. उदा. किल्ला, स्मारक, प्राचीन स्थापत्य असलेल्या वास्तू मंदिर, वाडा, प्राचीन वस्तूंचे संग्रहालये), गावातील जीवनशैलीमधून परंपरा आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे.
Best Tourism Village Agri Tourism
गावातील प्रमुख पर्यटन आकर्षण शेती किंवा शेती आधारित प्रक्रिया उद्योग असणे आवश्यक. ज्या मार्फत गावात येणाऱ्या पर्यटकांना शेतीबाबत अनुभव दिला पाहिजे.
Best Tourism Village - Craft
 असे गाव जेथे हस्तकला वस्तूंचे उत्पादन केले जाते. उदा. बांबू पासून बनवलेल्या वस्तू, लाकडी खेळणी, हातमागावरील वस्त्र, वारली चित्र, मातीच्या/धातूच्या/काचेच्या/लाकडी भांडीवर नक्षीकाम इ. हस्तकला करणारे कलाकार हे गावातील स्थानिक असावेत. कारागिरांनी गावात राहून कलाकुसर केली पाहिजे. हस्तकला वस्तूंची जाहिरात आणि विक्री गावातच झाली पाहिजे.


इथ करा अर्ज .. 
ग्रामीण भागात पर्यटनाचा विकास करणे त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढवणे  व रोजगार निर्मितीला चालना देणे यासाठी  “बेस्ट टुरिझम व्हिलेज" ही स्पर्धा  आयोजित करण्यात आली  आहे. स्पर्धेबाबतचा  सविस्तर तपशील मार्गदर्शक तत्वे व ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती www.rural.tourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.
 

Web Title: Latest News Organization of "Tourism Village competition, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.