Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

Vermicompost production technique that enriches soil | माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत.

आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत.

शेतकरी बंधुंनो, आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पहिला तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेती मधलाच एक घटक आहे.

गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतात त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते तसेच शेताचा पोत देखील सुधारतो. त्याच बरोबर गांडूळ खत निर्मितीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून ही पाहू शकतात. चला तर मग, गांडूळ खत निर्मितीची माहिती घेऊ, गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात.

या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो, गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.

गांडूळ खत निर्मिती
-
गांडूळ खत निर्मितीसाठी जागा निवडत असताना सावली असले अशी जागा निवडावी, एखाद्या झाडाखाली, छपरामध्ये, किंवा खोलीमध्ये गांडूळ खताचा बेड असावा, जिथे बेड असेल तेथील जमीन टणक असावी. जेणेकरून गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अलीकडे प्लास्टिकचे रेडिमेड बेडही मिळत आहेत त्याचादेखील आपण विचार करू शकतो.
- २० फूट लांब ३ फूट रुंद आणि २ फूट उंच असा बेड तयार करावा, सुरवातीला त्यामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट गवत ६ इंचाचा थर करावा. त्यावर एक ते दीड फूट शेणखत टाकावे. आता यावर २ किलो गांडूळ सोडावे आणि त्यावर बारदाणाने (पोत्याने) झाकून १० ते २० लिटर पाणी रोज मारावे. पोती झाकताना वापसा राहील याची काळजी घ्यावी. सात ते आठ दिवसात गांडूळाची विष्टा दिसायला लागेल, याचाच अर्थ आपला गांडूळ खात तयार होत आहे.
अश्या पद्धतीने ३० ते ३५ दिवस पाणी मारत राहावे. त्यानंतर तुम्हाला निदर्शनास येईल कि गांडूळ खत तयार झाले आहे. मग काही दिवस पाणी मारणे बंद करावे.
- गांडूळ खात कोरडे झाल्यानंतर त्या गांडूळ खाताला छोट्या भागात विभागून चाळून घ्यावे. हे खत गोणी मध्ये भरून ठेवावे लागेल तसे वापरावे.

महेश रुपनवर 

Web Title: Vermicompost production technique that enriches soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.