Join us

Maka Solni Yantra : तासाचे काम मिनिटांत करणारे मका सोलणी यंत्र, नेमकं कसं काम करतं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:22 IST

Maka Solni Yantra : कणसापासून दाणे (Maize Crop) वेगळे करण्यासाठी पारंपारीक पद्धतीने ती काढीने बडविली जाते, त्यामुळे हाताला इजा होते.

Maka Solni Yantra :  ग्रामीण भागामध्ये शेतीकामासाठी मजुरांची कमतरता जाणवत असून शेतकऱ्यांनाही यांत्रीकीकरणाशीवाय पर्याय उरलेला नाही. शेतीचे कामे वेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानास सामोरे जावे, लागते यावर उपाय म्हणजे सुधारीत शेती औजारांचा वापर करणे सोयीस्कर ठरते. 

कणसापासून दाणे (Maize Crop) वेगळे करण्यासाठी पारंपारीक पद्धतीने ती काढीने बडविली जाते, त्यामुळे हाताला इजा होते. तसेच बियांची अंकुरणक्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी मका सोलणी यंत्र वापरले जाते. एका हाताने यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस (Maka Solni Yantra) घालून पुढे मागे फिरविल्याने मका दाणे खाली गळून पडतात. 

मका सोलणी यंत्र

  • या यंत्राचा उपयोग मक्याच्या वाळलेल्या कणसाचे दाणे काढण्यासाठी होतो.
  • एक मजूर २०० किलो मक्याची कणसे एका दिवसात सोलतो.
  • हे यंत्र आकाराने लहान व वजनाने हलके असते, हातात सहजपणे धरून फिरवून दाणे काढणे सोपे जाते.
  • यामुळे श्रम कमी होतात. वेळेची बचत होते.
  • या यंत्राद्वारे सोलणी केल्यास प्रति तास २२ ते २५ किलो दाणे मिळतात. 
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठातून हे अवजारं मिळण्यास मदत होईल. 

 

- ग्रामीण कृषि मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी. 

Jamin Kharedi : खरेदी करावयाच्या मिळकतीबाबत केस सुरु असल्यास... जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकापीक व्यवस्थापनकाढणीशेती