Join us

सणासुदीच्या दिवसांत कोणत्या खाद्यपदार्थात अधिक भेसळ होऊ शकते? आणि ती कशी ओळखायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:37 IST

Anna Bhesal आजच्या धावपळीच्या जीवनात आपण खातो त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता कितपत सुरक्षित आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत, मसाल्यांपासून ते शीतपेयांपर्यंत अनेक पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण खातो त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता कितपत सुरक्षित आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत, मसाल्यांपासून ते शीतपेयांपर्यंत अनेक पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे.

पदार्थ आकर्षक दिसावे, चटकदार व्हावेत आणि कमी खर्चात नफा वाढावा, यासाठी काही व्यापारी भेसळ करून थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत.

सणासुदीच्या दिवसांत मिठाई व खाद्यपदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या संधीचा गैरफायदा घेत काही नफेखोर आणि बेकायदेशीर प्रवृत्तीचे लोक मिठाई, तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात.

भेसळीचे आरोग्यावरील परिणाम◼️ भेसळयुक्त पदार्थ खाण्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.◼️ पोटदुखी, अपचन, उलट्या, अतिसार, अन्नातून विषबाधा होणे, पोटात जंत होणे.◼️ काही रासायनिक पदार्थांचा वारंवार वापर केल्यास मूत्रपिंडे आणि यकृतावर वाईट परिणाम होतो.◼️ कर्करोग होण्याची शक्यता वाढते. चेहऱ्यावर पुरळ येणे असे धोके आहेत.

कोणत्या पदार्थात भेसळ होऊ शकते?◼️ बहुतांश भेसळ हा सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाई आणि अन्य पदार्थांमध्ये केलेली आढळते.◼️ यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.◼️ ताक, पनीर, चक्का, खवा, श्रीखंड यामध्ये भेसळ होण्याची शक्यता अधिक असते.◼️ दैनंदिन वापरातले पदार्थात तूप, खाद्य तेल, मसाले, चहा पावडर.

रंग आणि वास यावरून भेसळ कशी ओळखायची?रंग : नैसर्गिक पदार्थाचा रंग फिकट असतो. खूप चमकदार किंवा ठळक हे कृत्रिम रंगाचे लक्षण असते.किंमत : बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त मिळणाऱ्या मालापासून सावध रहावे.गंध : पदार्थांना नेहमीपेक्षा वेगळा आणि तीव्र वास येतो.सर्वाधिक भेसळ होणारे पदार्थदूध : अशुद्ध पाणी, स्टार्च, साबण पावडर मिसळली जाते.तूप आणि तेल : हानिकारक रंग, स्टार्च, वनस्पती तेल मिसळले जाते.

दुग्धजन्य आणि फळे, भाजीपाला पदार्थात भेसळ कशी ओळखावी?दूधकाचेवर टाकल्यास पटकन पसरेल तर पाणी मिसळलेले आहे. आयोडिन टाकल्यावर निळसर रंग आला तर स्टार्च आहे.पनीर आणि खवागरम पाण्यात टाकल्यावर वितळले तर भेसळ आहे. मसाले मिरची पूड हातावर चिकटली तर कृत्रिम रंग आहे. हळदीत फेस आला तर त्यात रसायनाची भेसळ आहे.भाजी आणि फळेभाजी आणि फळे पाण्यात धुतल्यावर तेलकटपणा जाणवला तर मेणाचा थर आहे.तेल आणि तूपतेल आणि तूप फ्रीजमध्ये गोठवल्यावर वेगवेगळे थर दिसले तर ते शुद्ध नाही.

काय काळजी घ्यावी?◼️ नेहमी प्रमाणित कंपनीचे व FSSAI लोगो असलेले पॅकबंद पदार्थ खरेदी करा.◼️ उघड्यावर विकल्या जाणारे दूध, मावा, मिठाई, मसाले यांचा वापर टाळा.◼️ घरच्या घरी साध्या चाचण्या करून भेसळ तपासा.◼️ भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनला त्वरित कळवावे.

अधिक वाचा: क्षारांपासून बनलेला मुतखडा असो वा हृदयाचे आजार 'हे' फळ आहे एकदम प्रभावी उपाय

टॅग्स :अन्नदूधदुग्धव्यवसायसरकारदिवाळी 2024अन्न व औषध प्रशासन विभागआरोग्य