lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Photostory: हळदीवर पॉलिश केल्याने भावावर पडतो फरक, कशी करतात ही प्रक्रीया?

Photostory: हळदीवर पॉलिश केल्याने भावावर पडतो फरक, कशी करतात ही प्रक्रीया?

Turmeric polish process: Polishing on turmeric makes a difference in price, how is this process done? | Photostory: हळदीवर पॉलिश केल्याने भावावर पडतो फरक, कशी करतात ही प्रक्रीया?

Photostory: हळदीवर पॉलिश केल्याने भावावर पडतो फरक, कशी करतात ही प्रक्रीया?

हळद शिजवणीपासून पॉलिशिंगपर्यंत हळदीची प्रक्रीया अशी होते.

हळद शिजवणीपासून पॉलिशिंगपर्यंत हळदीची प्रक्रीया अशी होते.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या हळदीला चांगला भाव मिळत असून अनेक भागात हळदीला पॉलिश करण्याची प्रक्रीया सुरु आहे. हळदीला चांगला भाव मिळण्यासाठी तिची जाडी, लांबी,चकाकी पाहिली जाते. शिजवलेली हळद ८ ते १० दिवस उन्हात वाळवल्यानंतही तिची प्रतवारी, पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते.

चांगला बाजारभाव मिळण्यासाठी हळदीला पॉलिश करणे महत्वाचे ठरते. सध्या शेतकरी त्यांच्या हळदीला पॉलिशिंग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रात आणत आहे. हळदीला चकाकी आणताना ही प्रक्रीया कशी होते? जाणून घ्या..

शिजवलेल्या हळदीला आधी ८ ते १० दिवस ऊन दिले जाते. त्यामुळे ती वाळते.

सुकवायला टाकलेल्या हळकुंडापैकी वाळलेले हळकुंड निवडले जातात.हे हळकुड पिंपात टाकून त्यात ५ ते ७ अणूकुचीदार दगड घर्षणासाठी टाकले जातात. 
हळद शिजवताना हळदीवर मातीचा थर बसलेला असतो. त्यामुळे ती काळपट दिसते किंवा चिरते. हा वरचा मातीचा थर पॉलिश केल्यानंतर हळदीला चकाकी येते.
यासाठी लोखंडी पिंप वापरतात. टँकरमध्ये हळद भरून त्याला गोलाकार फिरवले जाते.

हा पिंप गोलाकार मोटरच्या आधारे फिरवता येतो. ही प्रकीया झाल्यावर हळकुंड पोत्यात भरून त्याचे वजन केले जाते.

यानंतर हळद विक्रीसाठी तयार होते.


 

Web Title: Turmeric polish process: Polishing on turmeric makes a difference in price, how is this process done?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.