ICAR Banana Juice : तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीस्थित आयसीएआर (ICAR) अंतर्गत असलेल्या केळी संशोधन केंद्राने नवे संशोधन केले आहे. तुळशीच्या बिया असलेले रेडी-टू-सर्व्ह केळीचा ज्यूस (Basil Seed Banana Juice) तयार केला असून याचे पेंटटही मिळाले आहे. यामध्ये तुळशीच्या बियांचा वापर करून केळीचा रस बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) - राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB) ने हे संशोधन केले आहे. हा रस चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे साखरेचा कामित कामि वापर केला गेला आहे. ज्यामुळे ते पूर्णपणे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पेय बनले आहे.
हा रस केळीचा रस, भिजवलेल्या तुळशीच्या बिया आणि फूड ग्रेड सस्पेंडिंग एजंट्स वापरून बनवला जातो. त्यांच्या मदतीने, रसात असलेले तुळशीचे बिया तळाशी स्थिरावत नाहीत किंवा वर तरंगत नाहीत, तर ते संपूर्ण रसात समान रीतीने मिसळतात. यामुळे तुम्हाला प्रत्येक घोटात चव आणि पोषण दोन्ही मिळते.
आरोग्यासाठी फायदेशीरआयुर्वेदात तुळशीच्या बिया खूप उपयुक्त मानल्या जातात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जसे की:
- लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म - शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
- अँटीपायरेटिक गुणधर्म - तापात फायदेशीर.
- पचनास मदत करते - अन्न पचवण्यास मदत करते आणि पोट थंड करते.
हा रस कसा तयार केला जातो?हा रस तयार करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी एक विशेष एंजाइम-आधारित प्रक्रिया (एंजाइमॅटिक ट्रीटमेंट) स्वीकारली आहे, ज्याद्वारे केळीचा रस पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शक बनवला गेला आहे. त्यानंतर विशेष सुरक्षित अन्न ग्रेड एजंट एकत्रित मिळसतात. जवळपास सहा महिन्यापर्यंत या रसाची टिकवणक्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे.