Join us

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना कुठली उपउत्पादने तयार होतात? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 20:35 IST

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना तयार होणारी उपउत्पादनेही उपयुक्त असतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो.

Millet Milk : मिलेट दूध हे पारंपारिक भरडधान्यापासून तयार होणारे एक आधुनिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उत्पादन आहे. हे दूध विविध पारंपारिक व औद्योगिक पद्धतींनी तयार करता येते. मिलेट मिल्क तयार करताना तयार होणारी उपउत्पादनेही उपयुक्त असतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो.

मिलेट्समध्ये आहारतंतू (डायटरी फायबर), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखी आवश्यक खनिजे विपुल प्रमाणात असतात आणि हे तृणधान्य ग्लूटेन-मुक्त असतात. या भरड धान्यांचा एक नाविन्यपूर्ण उपयोग म्हणजे भरड धान्य किंवा मिलेट दूध जे भरड धान्यांपासून तयार केले जाते आणि गाई/म्हैशीच्या दुधाचा पर्याय म्हणून वापरले जाते.

मिलेट चोथा (Residue) : गाळणी प्रक्रियेनंतर उरलेला चोथा म्हणजे फायबरयुक्त, अन्नघटकांनी समृद्ध पदार्थ असतो. याचा वापर पोळी, भाकरी, बिस्कीट्स, केक, पिठात मिसळणे किंवा इतर बेकिंग प्रक्रियांसाठी करता येतो. त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य वाढते आणि अन्नाचा अपव्यय टाळता येतो.

भिजवलेले पाणी : काही प्रक्रियांमध्ये विशेषतः खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स यांची मात्रा वाढवण्यासाठी मिलेट भिजवताना वापरलेले पाणी पुन्हा दुधामध्ये मिसळले जाते. हे पाणी अन्नातील सेंद्रिय पदार्थ आणि पोषक घटक टिकवून ठेवण्यास मदत करते. या उपउत्पादनांचा योग्य उपयोग केल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक शाश्वत व पोषणक्षम बनते.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायशेती क्षेत्रशेतीपाककृती