'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:18 PM2024-05-03T20:18:28+5:302024-05-03T20:20:02+5:30

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे.

Rahul Gandhi Nomination: 'Mother entrusted Karmabhumi with faith...', Rahul Gandhi's sentiments after filing his nomination from Rae Bareli | 'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

Rahul Gandhi Nomination: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी(3 मे) रायबरेलीमधून(Raebareli) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा हेही उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने कुटुंबाची वारसा माझ्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात तेथे मतदान झाले.

काय म्हणाले राहुल गांधी?
उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्यावर कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि मला रायबरेलीची सेवा करण्याची संधी दिली. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळे नाहीत, दोघेही माझे कुटुंब आहेत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीतून पक्षाने संधी दिल्याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे." 

प्रियंका गांधी यांची पोस्ट 
प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. 'काही दिवसांपूर्वीच आईने म्हटले होते की, माझे कुटुंब अपुरे आहे.ते रायबरेलीत पूर्ण होते. असे कुटुंब, ज्याने अनेक पिढ्यांना जवळ केले. हे कुटुंब अनेक दशकांपासून प्रत्येक चढ-उतारात, सुख-दुःखात, संकटात खडकाप्रमाणे पाठिशी उभा आहे. हे आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. या लोकांकडून आम्हाला जेवढे प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला, तो अमूल्य आहे.' 

रायबरेली आणि अमेठीमध्ये 20 मे रोजी मतदान 
काँग्रेसने शुक्रवारी (3 मे) रायबरेली आणि अमेठीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीत राहुल गांधींचा सामना काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) गेलेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे, तर किशोरीलाल शर्मा यांचा सामना स्मृती इराणी यांच्याशी आहे. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Web Title: Rahul Gandhi Nomination: 'Mother entrusted Karmabhumi with faith...', Rahul Gandhi's sentiments after filing his nomination from Rae Bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.