मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:13 AM2024-05-03T06:13:37+5:302024-05-03T06:14:09+5:30

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Case registered against Avinash Jadhav of MNS Accused of threatening gold jewelery trader Jain for recovery of Rs 5 crores | मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप

मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप

मुंबई :  ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा सोमवारी नोंदवला. झवेरी बाजार येथील सराफ कार्यालयात येऊन दमदाटी करत पाच कोटींच्या वसुलीसाठी धमकावल्याच्या सराफाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जैन यांच्या तक्रारीनुसार ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव त्यांचे सहकारी, बॉडीगार्ड व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.    

याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता,  एका वैभव नावाच्या व्यक्तीने मला कॉल करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले, असे सांगितले होते. मी त्याला पोलिस नियंत्रण कक्षात कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर, मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो असे जाधव यांनी सांगितले. आपल्या विरोधात दाखल गुन्ह्याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तपास सुरू

जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. तसेच याप्रकरणी क्रॉस केस घेण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Case registered against Avinash Jadhav of MNS Accused of threatening gold jewelery trader Jain for recovery of Rs 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.