घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:38 PM2024-05-16T20:38:18+5:302024-05-16T20:39:11+5:30

Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: उदयपूरच्या हॉटेलमध्ये भाच्याच्या नावाने रूम बूक करून राहत होता भावेश

Bhavesh Bhinde, the accused in the Ghatkopar hoarding incident, has been arrested by the police | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध

Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. घाटकोपर भागातील एक मोठे होर्डिंग कोसळून त्यात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली दबून अनेक जण जखमी झाले. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेबाबत राजकीय स्तरावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना दिसले. याचदरम्यान, या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला अखेर पोलिसांनीअटक केली आहे.

दोन दिवस होता फरार, कुठून केली अटक?

होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेनंतर भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर येथून भावेश भिंडेला अटक केली. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती, तिथे तो राहत होता. मुंबई पोलिसांनी तपासात कुठलीही कसून न ठेवता त्याला अटक केली.

Web Title: Bhavesh Bhinde, the accused in the Ghatkopar hoarding incident, has been arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.