"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:56 AM2024-05-17T11:56:07+5:302024-05-17T11:57:19+5:30

मी सभेला सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो. मी शरद पवारांच्या नावाने आणि कुठल्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिली नाही असं या युवकाने सांगितले.

Loksabha Election 2024 - "I went to Narendra Modi Sabha Not a Sharad Pawar NCP Party Worker, but as a farmer" Kiran Sanap Meet Sharad Pawar | "मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"

"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"

नाशिक - दिंडोरी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणारा युवक किरण सानप याने शरद पवारांची भेट घेतली. किरण हा पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून २०१९ पासून तो पक्षाचं काम करतो. शेतकरी म्हणून मी पंतप्रधानांच्या सभेला गेलो होतो असं सांगत शरद पवारांनी भाषणात हा माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं म्हटलं होतं. त्यासाठी त्यांच्या भेटीसाठी आलो असं किरण सानप याने सांगितले. 

पवारांच्या भेटीनंतर किरण सानप म्हणाला की, शरद पवारांनी मला आशीर्वाद दिले, पोलिसांनी काही त्रास दिला का? अशी विचारपूस केली. मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निफाड तालुका कांद्याची पंढरी आहे. कांदा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. मी १५ मिनिटे मोदींचं भाषण ऐकलं. कांद्यावर ते बोलतील हे मला जाणवलं नाही. त्यामुळे पर्यायाने मला कांद्यावर बोला ही घोषणा द्यावी लागली असं त्याने सांगितले. 

तसेच मी सभेला सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो. मी शरद पवारांच्या नावाने आणि कुठल्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिली नाही. मी शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो होतो. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सभेला असतो तर शरद पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्या असत्या. पोलिसांनी मला ताब्यात घेतले. त्यानंतर काल संध्याकाळी जामीनावर मला सोडण्यात आले असंही किरण सानप याने म्हटलं.

दरम्यान, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तिथे धर्माच्या आधारे बोलण्यापेक्षा कांद्यावर बोला असं मला सांगावे लागले. पोलिसांनी माझा फॅमिली बॅकग्राऊंड तपासून सोडून दिले. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने त्यांना माझ्यावर टीका करावी लागेल. कारण दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीची हवा जोरात आहे. होय, मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण मी सामान्य शेतकरी म्हणून सभेला गेलो. आम्हाला मिळणारे ६ हजार बंद करा आणि आमच्या मालाला भाव द्या अशी माझी मागणी होती असंही युवक किरण सानप याने सांगितले. 

Web Title: Loksabha Election 2024 - "I went to Narendra Modi Sabha Not a Sharad Pawar NCP Party Worker, but as a farmer" Kiran Sanap Meet Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.