पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक

By मुरलीधर भवार | Published: May 16, 2024 05:59 PM2024-05-16T17:59:41+5:302024-05-16T18:03:28+5:30

Maharashtra lok sabha election 2024 : नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कल्याणमध्ये महाविजय संकल्प सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले.

Prime Minister Narendra Modi Dr. Appreciated by sending a letter to Srikant Shinde | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक

डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कल्याणमध्ये महाविजय संकल्प सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा क्षेत्रात खासदार डॉ. शिंदेकडून झालेल्या कामाबाबत कौतुकाची थापही दिली आहे. तसेच केंद्रातील विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून खासदार  शिंदे यांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी पार पडली. ही सभा कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता घेण्यात आली. या सभेत त्यांनी शिंदे आणि कपिल पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांना गुरुवारी पत्र पाठवून विजयी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. शिंदे हे अत्यंत मेहनत आणि मन लावून मतदारसंघाच्या विकासाकरिता झटत आहेत. त्यांचे काम उल्लेखनीय आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi Dr. Appreciated by sending a letter to Srikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.