lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-Jun-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

कुटुंबाशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. आठवड्याच्या मध्यास कामा निमित्त एखादा दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. प्रवासा दरम्यान आपल्या प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी. ह्या दरम्यान पैतृक संपत्तीशी संबंधित विवादामुळे नातेवाईकांशी भांडण होऊ शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यपुर्तीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. प्राप्तीच्या मानाने खर्च जास्त होईल. सुखसोयींशी संबंधित वस्तूंवर प्रमाणापेक्षा जास्त खर्च झाल्याने मन काहीसे खिन्न होईल. प्रणयी जीवनात आपल्या प्रेमिकेशी एकनिष्ठ राहून कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावे, अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराची प्रकृती व मुलांच्या भविष्या विषयी मन थोडे चिंतीत होऊ शकते.

राशी भविष्य

02-06-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण एकादशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 15:52 to 17:31

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:21 to 17:9

राहूकाळ : 17:31 to 19:10