गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतल्या कार्टर रोड येथे पत्रकारांनी व्यक्त केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 19:38 IST2017-09-06T19:38:18+5:302017-09-06T19:38:38+5:30
देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप ...
देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतल्या कार्टर रोड येथेही संध्याकाळी 6 वाजता पत्रकारांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी पत्रकारांवरील हल्ले सहन करणार नसल्याचे निषेध फलक झळकावण्यात आले.