Next

मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:56 AM2018-12-20T11:56:53+5:302018-12-20T12:06:00+5:30

मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथील बसमेंटमध्ये बुधवारी (19 डिसेंबर) आग लागल्याची घटना समोर आली होती. 

मुंबई  -  मुंबईतील   हॉटेल  ट्रायडंट येथील बसमेंटमध्ये बुधवारी (19 डिसेंबर)  आग  लागल्याची घटना समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मरीन ड्राईव्ह परिसरात हे पंचतारांकित  हॉटेल  असून या हॉटेलमधील खालच्या बाजूस असलेल्या लहान दुकानातून ही आग भडकली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.