Next

वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला मिळणार झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 08:12 AM2019-02-13T08:12:24+5:302019-02-13T08:13:46+5:30

मुंबई : खूप मोठा इतिहास लाभलेल्या वैभवशाली वांद्रे स्थानकाला जागतिक हेरिटेज- १ चा दर्जा आहे. या हेरिटेज स्थानकांची माहिती ...

मुंबई : खूप मोठा इतिहास लाभलेल्या वैभवशाली वांद्रे स्थानकाला जागतिक हेरिटेज- १ चा दर्जा आहे. या हेरिटेज स्थानकांची माहिती सर्व प्रवाशांना मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक वांद्रे स्थानकात मंगळवारपासून ‘हेरिटेज उत्सव’ भरविण्यात आला आहे. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पश्चिम रेल्वेचे वरीष्ठ यांत्रिक विभागाचे अभियंता ए. अग्रवाल, मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी केले.