Supriya Sule: सुप्रिया सुळेंसमवेत बॉलिवूडची ती 'शक्ती'शाली महिला कोण? ओळखा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:18 PM2022-02-17T16:18:55+5:302022-02-17T16:43:27+5:30

महिला सक्षमीकरणासाठी आपण करत असलेलं काम हे प्रेरणादायी आहे. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण अथक परिश्रम घेता हे पाहून आश्चर्य वाटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असतात. आपल्या दैनंदीन घडामोडींची माहितीही त्या ट्विटरवरुन देतात.

सुप्रिया सुळेंची नुकतेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर शक्ती मोहन हिने भेट घेतली. मात्र, या भेटीच्या फोटोत मास्कमुळे ती अजिबात ओळखू येत नाही.

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. तसेच, विथ शक्ती मोहन असं कॅप्शन त्यांनी दिलंय. त्यांचं हे ट्विट शक्ती मोहनने रिट्विट केलं आहे.

शक्ती मोहन ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर असून डान्सर आहे, तसेच अनेक रिएलिटी शोमध्येही ती जज म्हणून काम करत असल्याचं आपण टिव्हीवर पाहिलं आहे.

शक्ती मोहननेही सुप्रिया सुळेंची ट्विट रिट्विट करत, महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामाचं कौतूक केलंय. तसेच, आपणास भेटून अत्यानंद झाल्याचंही म्हटलंय.

महिला सक्षमीकरणासाठी आपण करत असलेलं काम हे प्रेरणादायी आहे. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण अथक परिश्रम घेता हे पाहून आश्चर्य वाटलं.

आपणास अधिकाधिक ऊर्जा मिळो, असे म्हणत शक्ती मोहनने सुप्रिया सुळेचं कौतूक केलं आहे.

सुप्रिया सुळे नेहमीच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या भेटीचे फोटो ट्विटरवरुन शेअर करतात. तसेच, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचं अभिनंदही करतात.