Sadabhau Khot: "महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:02 PM2022-04-25T18:02:22+5:302022-04-25T18:20:52+5:30

एकंदरीत राज्यात चाललेलं हे राजकारण कुणीही चांगलं म्हणत नाही. विशेष म्हणजे जे हे करतायंत तेही ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत आहेत.

राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना अनेक विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ राजकारणी आणि सर्वसामान्य जनताही चिंता व्यक्त करत आहे.

शिवसेना भाजप यांच्यातील एममेकांच्या सुडाचं राजकारण पाहता, सर्वसामान्यांचे प्रश्न बाजुला पडले असून नेतेमंडळींना आतमध्ये टाकण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येते.

राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्यासाठी केलेला हट्ट्, त्यानंतर शिवसैनिकांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा आणि मुंबई पोलिसांनी घेतलेली एक्शन सध्या चर्चेत आहे.

याच दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यामुळे भाजप नेतेही तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

एकंदरीत राज्यात चाललेलं हे राजकारण कुणीही चांगलं म्हणत नाही. विशेष म्हणजे जे हे करतायंत तेही ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत आहेत.

यावरुनच, रयत शेतकरी संघटनेचे नेते आणि भाजपचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी हे राजकारण, राजकीय सूड नाट्य असल्याचे म्हणत शिवसेनेवर प्रहार केला आहे.

"महाराष्ट्रातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस ( @Dev_Fadnavis ) सरकार आहे.", असे खोत यांनी म्हटलं.

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं आहे.

मात्र, या अशा टिकांमुळेच, व्यक्तीगत टिका टिपण्णामुळेच सध्याचं राजकारण महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडीत काढताना दिसत आहे.