Raj Thackeray: राज ठाकरेंच्या नातवाचा रुबाब, डावीकडे CM अन् उजवीकडे डेप्युटी CM

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:01 AM2022-10-22T10:01:26+5:302022-10-22T10:22:14+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. राज यांच्याकडून यावेळी मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली. मात्र, या दीपोत्सव सोहळ्यात राज ठाकरेंचा नातूही भाव खावून गेला.

राज यांच्याकडून यावेळी मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली. मात्र, या दीपोत्सव सोहळ्यात राज ठाकरेंचा नातूही भाव खावून गेला.

राज ठाकरेंच्या हातात त्यांचा नातू किआन होता, या नातवाला गोंजारण्यासाठी अनेकांनी पुढे येऊन स्मीतहास्य केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राजनातवाचा शानदार रुबाब दिसून आला.

एका छायाचित्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्या बाजुला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उजव्या बाजुला दिसून येत आहेत. त्यासोबतच, राज ठाकरेंच्या हाती त्यांचा नातू किआन ठाकरे आहे. सीएम आणि डेप्युटी सीएमच्या मध्ये राज नातवाचा रुबाबदारपणा उठून दिसत आहे.

मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, आता राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

मनसेच्या वतीने दिपावलीनिमित्त गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

इश्वराने आपल्याला सुख समाधान आणि ऐश्वर्य द्यावे आपल्या सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत. दिवाळी हा महत्वाचा सण आहे. आपल्या या परिसरात लक्ष लक्ष दिवे प्रज्वलित झाले आहेत. या ठिकाणी जो प्रकाश बघायला मिळत आहे तसाच प्रकाश आपल्याही आयुष्यात यावा, अशा सब्दात फडणवीस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा दिपोत्सव गेल्या १० वर्षांपासून साजरा केला जातो. गेली दोन वर्षं कोरोनामुळे इच्छा असूनही अनेक उत्सव आपल्याला साजरे करता येत नव्हते.

सर्वांना सोबत घेऊन ही दिवाळीची सुरुवात राज ठाकरे आणि सर्व सहकारी करतात मी त्यांचे अभिनंद करतो. आपण अनेक ठिकाणी बघतो की, दिवाळीत आपण आकाशकंदील लावून आणि रांगोळ्या काढून आनंद साजरा करतो. आपण नवरात्री आदी कार्यक्रमांत मोकळा श्वास घेतला आणि मोकळे झालो. दिवाळीची चांगली सुरुवात आहे.

शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने आता महायुतीची चर्चा रंगली आहे. दरम्यान, हा दीपोत्सव तुळशीच्या लग्नापर्यंत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं