जाणून घ्या... एसी लोकलचा तिकिट दर, पहिला प्रवासी आणि ट्रेनच्या सुरक्षेबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:20 AM2017-12-25T11:20:39+5:302017-12-25T11:42:02+5:30

सोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी बोरीवली स्थानकातून 'भारतमाता की जय' या घोषणांमध्ये पहिली एसी लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली.

महिला तसेच अन्य प्रवाशांनी एसी लोकलमध्ये ग्रुपने सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

एसी लोकलचे पहिले तिकिट धारक बोरीवलीचे धिरेंद्र त्रीपाठी.

एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 12 आरपीएफ जवान तैनात असतील. यामध्ये दोन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे.

बोरीवली ते चर्चगेट मार्गावर एसी लोकल धावेल. पहिल्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी १६५ रुपये मोजावे लागतील. चर्चगेट ते विरार एसी लोकलचा मासिक पास २०४० रुपये आहे.

एसी लोकलच्या पहिल्या फेरीची आठवण म्हणून ग्रुप सेल्फी काढताना महिला.