होळी सेलिब्रेशन Photo's : रंगून रंगात साऱ्या, 'रंग' माझा वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 02:24 PM2020-03-10T14:24:35+5:302020-03-10T14:37:46+5:30

देशभरात होळीचा उत्साह दिसून येत आहे, होळीच्या रंगावर कोरोनाचं सावट असतानाही रंगात एकरुप झालेली तरुणाई पाहायला मिळत आहे. सर्व फोटो: सुशील कदम

होळीच्या शुभेच्छा देताना, कोरड्या रंगात रंगलेल्या तरुणाईच्या चेहऱ्यावर होळीचा उत्साह दिसून येतंय

आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत तरुणाईने रंगपंचमी साजरी केली, एकमेकांना रंगात रंगवताना

हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल ... हे तर सगळे जोकर

बुरा न मानो होली है, लाल-भगवा-हिरवा, निळा-हिरवा सगळे रंग आज एकरंग झाले आहेत. जणू दुनिया रंगीबेरंगी बनलीय

आपल्या मित्राला घेराव घालून रंगवताना मित्रमंडळी

अशी पाहिजे होळी, तोंड घुसळल सगळं रंगात. मुंबईतील दादरमधील हे छात्राचित्र आहेत.

आपल्या मैत्रिणीला रंगात न्हावू घालताना, मित्रमंडळ. हे क्षण म्हणजे आनंदी आनंद गडे - सर्व फोटो: सुशील कदम