22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पाहा फोटो एकाच क्लीकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 07:22 AM2019-09-13T07:22:41+5:302019-09-13T07:29:19+5:30

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शेकडो गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी केली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटी येथे दाखल झालेला आहे.

थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. राजाचं शेवटच दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजारो गणेशभक्त दाखल झालेत

संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.