The work of the Trans Harbor Link is in the fourth year | ट्रान्स हार्बर लिंकचे काम साडेचार वर्षांत

मुंबई : शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंकचे काम येत्या साडेचार वर्षांत पूर्ण केले जाईल तसेच नवी मुंबई विमानतळाचे पहिले टर्मिनल आणि एक रनवे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. अमेरिकन चेंबर आॅफ कॉमर्स इन इंडिया यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मेट्रोचे काम सुरु झाले असून येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह, आर्टिफीशीयल इंटेलीजन्स तयार करण्यावर भर देण्यात येईल. यासाठी विद्यापीठातून अभ्यासक्रम तयार करून शिकविण्यात येणार आहे. शहर विकासासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी एक हजार गावांमधून काम सुरु आहे.