डॉक्टरांनी गरज नसताना किडनी काढल्याचा महिलेचा आरोप, पीएमओकडून चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:07 AM2018-12-21T08:07:34+5:302018-12-21T08:12:03+5:30

सुनिताला जास्त त्रास होत नसतानाही किडनी काढण्याची सूचना करून, डॉक्टरांनी संमती नसतानाही हॉस्पिटलच्या किडनी काढून तिला शारीरिक अपंग बनल्याचा आरोप सुनिता यांनी केला आहे.

The woman accused of kidney extinction without needing the doctor, the PMO's order of inquiry | डॉक्टरांनी गरज नसताना किडनी काढल्याचा महिलेचा आरोप, पीएमओकडून चौकशीचे आदेश

डॉक्टरांनी गरज नसताना किडनी काढल्याचा महिलेचा आरोप, पीएमओकडून चौकशीचे आदेश

Next

मुंबई - पोटदुखीसाठी  उपचार घेताना डॉक्टरांनी संगणमताने किडनी काढून घेतल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्याच्या कवठे गावातील सुनिता इमडे या महिलेने केला होता. याबाबत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या पण काहीही उपयोग न झाल्याने महिलेने सनराइज हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन यांच्याकडे धाव घेतली. या संस्थेमार्फत थेट पंतप्रधान कार्यालयाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे सोलापुरातील अश्विनी रुग्णालयातील रुग्णसुविधावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात कवठे गावात राहणाऱ्या सुनिता इमडे ही जुलै 2016 ला आईच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे गेली होती. पोटात दुखत असल्याने सुनिता यांनी रुग्णालयात तपासणी केली. त्यावेळी, डॉक्टरांनी सुनिताला ऑपरेशनचा सल्ला दिला. हे ऑपरेशन राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजने मधून करण्याची हमीही देण्यात आली. त्यानंतर, सुनिताच्या आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या आईला, भावाला सुनीताची उजव्या बाजूची किडनी ही पूर्ण निकामी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच लवकरात लवकरच किडनी काढण्याचेही सूचवले. सुनिताची आई आणि भाऊ हे दोघेही अशिक्षित असल्याने त्यांच्या सह्या अंगठ्या घेऊन आपली किडनी काढून घेतल्याचा आरोप पीडित महिला सुनिता इमडे यांनी केला आहे.

सुनिताला जास्त त्रास होत नसतानाही किडनी काढण्याची सूचना करून, डॉक्टरांनी संमती नसतानाही हॉस्पिटलच्या किडनी काढून तिला शारीरिक अपंग बनल्याचा आरोप सुनिता यांनी केला आहे. विशेष म्हणजे या ऑपरेशनसाठी सुनिता यांच्याकडून 45 हजार रुपये घेतल्याची तक्रारही सुनिताना केली आहे. तर, आपल्या सर्व वैद्यकीय तपासण्यांनंतरचे अहवाल सुनिताने खासगी डॉक्टरांकडे दाखवले. त्यावेळी, किडनी काढण्याची गरज नसल्याचं संबंधित डॉक्टरांनी म्हटलं. त्यामुळे हे किडनीच बिंग उघड पडल्याचं सुनिताने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.  सुनिताने सनराईज हेल्थ अँड रिसर्च फाऊंडेशनच्या महेश नायकुडे यांच्या माध्यमातून आपल्यावरील अन्यायाची तक्रारा संबंधित आरोग्य अधिकारी आणि पीएमओ ऑफिसकडे केली. त्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


 

Web Title: The woman accused of kidney extinction without needing the doctor, the PMO's order of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.