मल्टिप्लेक्समध्ये सर्वच खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:30 AM2018-04-05T05:30:45+5:302018-04-05T05:30:45+5:30

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटलीचे अवाजवी दर आकारण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवत, प्रेक्षकांना घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करीत असल्यास इतर विक्रेत्यांनाही आतमध्ये खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी देऊ शकत नाहीत

 Will all ban on foods in multiplexes? | मल्टिप्लेक्समध्ये सर्वच खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का?  

मल्टिप्लेक्समध्ये सर्वच खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का?  

Next

मुंबई - मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटलीचे अवाजवी दर आकारण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवत, प्रेक्षकांना घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करीत असल्यास इतर विक्रेत्यांनाही आतमध्ये खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला खडेबोल सुनावले.
सुरक्षेच्या कारणास्तव घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल तर सरसकट सर्वच अन्नपदार्थांवर बंदी का घालत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने केला. कायद्यात कोणती तरतूद नसताना मल्टिप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे औषधोपचार व खाण्याचे पथ्य असलेल्या जेष्ठांची अडचण होते. तसेच मल्टिप्लेक्समध्ये अवाजवी दराने खाद्यपदार्थ विकले जातात. याबाबत राज्य सरकारला धोरण आखण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती जनहित याचिकाकर्ते जैनेंद्र बक्सी यांनी न्यायालयाला केली आहे. न्या. शंतनू केमकर व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १२ जून रोजी ठेवली आहे. प्रचलित दरापेक्षा जास्त दरात मल्टिप्लेक्समध्ये पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ विकले जातात. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. तुम्ही (मल्टिप्लेक्स) सामान्य दराने खाद्यपदार्थ का विकत नाही?, असे न्यायालयाने सुनावले.

धोरण आखणार
मल्टिप्लेक्स मालक संघटना व याचिकाकर्त्यांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन सरकार यासंदर्भात सहा आठवड्यांत धोरण आखेल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी दिली.

Web Title:  Will all ban on foods in multiplexes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.