मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:59 AM2024-04-16T10:59:30+5:302024-04-16T11:03:05+5:30

मुंबईसह लगतच्या शहरांतील कमाल तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला आहे.

western railway has taken up shital abhiyan to ensure that passengers get plenty of drinking water at railway stations | मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान

मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान

मुंबई :मुंबईसह लगतच्या शहरांतील कमाल तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला आहे. अशा वेळी तहानलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी पश्चिम रेल्वेने शीतल अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली असून, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर वॉटर कूलर आणि पाण्याच्या नळांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल मंडळात एकूण १९४ वॉटर कूलर आहेत. पाण्याचे नळ, वॉटर कूलर, पंखे, वेटिंग हॉलमधील एसी तपासले जात आहेत. प्रवाशांनी उष्णतेचा सामना कसा करावा, स्वत:ला हायड्रेट कसे ठेवावे, स्टेशन परिसरात उष्माघात झाल्यास कसा प्रतिसाद द्यावा? याची माहिती प्रवाशांना दिली जात आहे.

प्रवाशांना दिलासा-

१) पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.

२) माहितीपर पोस्टर लावले जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करत जनजागृती केली जात आहे. 

३) जिथे नागरिकांना पाणी वाचवा आणि उष्णतेवर मात करण्याच्या पद्धतीने असे रिल्स पाठविता येतील.

४) थोडक्यात, उन्हाळी हंगामात रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: western railway has taken up shital abhiyan to ensure that passengers get plenty of drinking water at railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.