कच-यावरील प्रक्रियेतून गांडूळखत , महापालिकेची माहिती : ११ ठिकाणी प्रकल्प सुरू, ६ प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:19 AM2017-10-16T07:19:43+5:302017-10-16T07:19:54+5:30

महापालिकेच्या १० कार्यालयांच्या परिसरांसह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्याच पुढाकाराने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत ओल्या कचºयापासून खतनिर्मिती आता सुरू झाली आहे.

Vermicompost, Municipal information from waste-related processes: 11 projects to be started, 6 projects on the basis of completion | कच-यावरील प्रक्रियेतून गांडूळखत , महापालिकेची माहिती : ११ ठिकाणी प्रकल्प सुरू, ६ प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर  

कच-यावरील प्रक्रियेतून गांडूळखत , महापालिकेची माहिती : ११ ठिकाणी प्रकल्प सुरू, ६ प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर  

googlenewsNext

मुंबई : महापालिकेच्या १० कार्यालयांच्या परिसरांसह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्याच पुढाकाराने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत ओल्या कच-यापासून खतनिर्मिती आता सुरू झाली आहे. या सर्व ११ ठिकाणी मिळून दररोज सुमारे २ हजार ४०० किलो एवढ्या कच-यापासून गांडूळखतनिर्मिती होत आहे. तसेच आणखी ६ ठिकाणी एकूण ६०० किलो क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
विलेपार्ले पश्चिम परिसरात असणा-या महापालिकेच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि आर. एन. कूपर रुग्णालय’ या परिसरात उत्पन्न होणाºया कचºयाचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण केल्यानंतर ओल्या कच-यापासून गांडूळखत तयार होण्यासाठी महाविद्यालयाच्याच परिसरात प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज सरासरी १०० किलो ओला कचरा टाकण्यात येतो. यापासून साधारणपणे ६ आठवड्यांत गांडूळ खत तयार होत आहे.
बोरीवली पश्चिम परिसरात असणाºया महापालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयाच्या परिसरातदेखील कचºयापासून खतनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. येथील प्रकल्पाची क्षमता दररोज साधारणपणे १५० किलो ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची आहे. बोरीवली पश्चिम परिसरातील महापालिकेच्या वनविहार उद्यानामध्ये १०० किलो ओल्या कचºयापासून गांडूळखतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
‘आर-दक्षिण’ विभाग कार्यालयांतर्गत कांदिवली पश्चिम परिसरातील दिव्यदर्शन सोसायटीच्या आवारात असणाºया महापालिकेच्या मंडई क्षेत्रातील ओल्या कचºयापासून गांडूळखतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ही ५० किलो ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची आहे.
‘पी-उत्तर’ व ‘पी-दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या परिसरातदेखील गांडूळ-खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता ही अनुक्रमे १०० व १५० किलो एवढी आहे. ‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या परिसरात ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती करणारे दोन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून यांची क्षमता ही प्रत्येकी १०० किलो एवढी आहे.
विलेपार्ले परिसरातील उपमुख्य पर्यवेक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात दैनंदिन २५ किलो एवढ्या क्षमतेच्या ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती करणारा प्रकल्प सुरू झाला आहे. भायखळा पूर्व परिसरातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय’च्या परिसरात महापालिकेचा सर्वाधिक क्षमतेचा गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे पंधराशे किलो एवढ्या ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती होत आहे. मंत्रालयाजवळील सारंग इमारतीसमोर महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्या पुढाकाराने गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू झाला असून त्याची क्षमता २५ किलो एवढी आहे.

महापालिकेच्या दहा जागांमध्ये प्रकल्प

एकंदर महापालिकेच्या १० जागांमध्ये, तर शासनाच्या अखत्यारीतील एका जागेवर ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून दररोज सुमारे २ हजार ४०० किलो ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती होत आहे.
त्याचबरोबर आणखी ६ ठिकाणी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्यामुळे आणखी ६०० किलो ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ज्यामुळे या प्रकल्पांची एकत्रित प्रक्रिया क्षमता दररोज ३ हजार किलो एवढी होणार आहे, अशीही माहिती बालमवार यांनी दिली आहे.

महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात खतनिर्मिती प्रकल्प उभारावयाचा झाल्यास मार्गदर्शनासाठी शहर विभागातील नागरिकांनी विनायक भट यांच्या ९००४-४४५-२४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

पूर्व उपनगरातील नागरिकांनी सुनील सरदार यांच्या ९८३३-५३९-०२३; तर पश्चिम उपनगरातील नागरिकांना पोमसिंग चव्हाण यांच्या ७०४५-९५०-७९७ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.

Web Title: Vermicompost, Municipal information from waste-related processes: 11 projects to be started, 6 projects on the basis of completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.