'मुंबै महोत्सवा'च्या संकेतस्थळाचे अनावरण! जीवनाधारचे सामाजिक कार्य गौरवास्पद - अरविंद सावंत

By संजय घावरे | Published: December 2, 2023 07:03 PM2023-12-02T19:03:57+5:302023-12-02T19:04:19+5:30

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ‘मुंबै महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

unveiling of the website of Mumbai Mahotsav Jeevanadhar's social work is glorious - Arvind Sawant | 'मुंबै महोत्सवा'च्या संकेतस्थळाचे अनावरण! जीवनाधारचे सामाजिक कार्य गौरवास्पद - अरविंद सावंत

'मुंबै महोत्सवा'च्या संकेतस्थळाचे अनावरण! जीवनाधारचे सामाजिक कार्य गौरवास्पद - अरविंद सावंत

मुंबई - मुंबै महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाद्वारे समाजाचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न अत्यंत गौरवास्पद आहे. या निमित्ताने जीवनाधार फाऊण्डेशनने सामाजिक क्षेत्रांत फारच महत्वपूर्ण काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी केले. मुंबै महोत्सवाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ‘मुंबै महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अरविंद सावंत यांच्यासोबत जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे, सचिव अनिता खाडे, रंगकर्मी व मुंबै महोत्सवाचे क्रिएटीव्ह हेड श्रीनिवास नार्वेकर, नाट्यनिर्मात्या व समाजमाध्यम समन्वयक सुप्रिया चव्हाण, हेमंत वीर आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी अध्यक्ष राजेश खाडे म्हणाले की, ‘मुंबै महोत्सवा’चे वेगळेपण जपण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. यावेळी त्यामध्ये अधिक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ व्यक्तींचा ‘मुंबै गौरव सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मुंबै भूषण, मुलखावेगळी माणसे, संस्थात्मक पातळीवर महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थेला सामाजिक कृतज्ञता सन्मान आणि ‘जीवनाधार जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. 

यंदा २ ते ४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पुरस्कार वितरणाखेरीज ‘मुंबै सायक्लोथॉन’ ही पर्यावरणपूरक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ‘आगळावेगळा जोडी विशेष मराठमोळा पारंपरिक फॅशन शो’ हे या महोत्सवाचे आकर्षण असेल. ४१ वाद्ये आणि ४२ कलाकारांचा सामावेश असलेला ‘नाद’ हा फ्युजन बॅण्ड, लावणी कलाप्रकारातील बदलत्या भाषेचा आढावा घेणारा ‘ये लावणीचे बोल कौतुके’ आणि मराठमोळा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

Web Title: unveiling of the website of Mumbai Mahotsav Jeevanadhar's social work is glorious - Arvind Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.