रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबास टँकरने चिरडले, दोघांचा मृत्यू 2 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 02:13 AM2019-06-09T02:13:59+5:302019-06-09T02:14:52+5:30

अपघातामधील जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले आहे

Two people injured in collision with tanker collapsed on road side | रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबास टँकरने चिरडले, दोघांचा मृत्यू 2 जखमी

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबास टँकरने चिरडले, दोघांचा मृत्यू 2 जखमी

Next

मुंबई - विक्रोळी येथील कैलास कॉम्प्लेक्स ठिबक टू हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 4 जणांना टँकरने चिरडले. या अपघातात 2 महिलांचा जागेवरच मृत्यू झाला असून 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष जखमी झाले  आहेत. रस्त्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातला आहे.  

अपघातामधील जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले आहे. रुग्णालयात दोघांना मृत आणले. तर एक लहान मूल गंभीर अवस्थेत आणले आणल्याची माहिती  डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय यांनी दिली आहे. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील अधिक तपास सुरू आहे. 


Web Title: Two people injured in collision with tanker collapsed on road side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.