चार विविध अपघातांत दोन ठार, सहा जखमी

By admin | Published: May 30, 2015 10:25 PM2015-05-30T22:25:55+5:302015-05-30T22:25:55+5:30

शुक्रवारी ट्रक पलटी होवून चौघे जखमी झाल्यानंतर शनिवारी पुन्हा ट्रक पलटी झाल्याने अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले.

Two killed and six injured in four different accidents | चार विविध अपघातांत दोन ठार, सहा जखमी

चार विविध अपघातांत दोन ठार, सहा जखमी

Next

पोलादपूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघाताची मालिका सुरुच असून शुक्रवारी ट्रक पलटी होवून चौघे जखमी झाल्यानंतर शनिवारी पुन्हा ट्रक पलटी झाल्याने अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. शनिवार दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
शंकरसिंग मुणसी (२७, रा. झारखंड) आपल्या ताब्यातील ट्रक (जीजे ४८/६९३८) घेवून गोवा मार्गे गुजरातकडे जात असताना कशेडी घाटात धामणदेवी गावजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात त्याच्या शेजारी बसलेला क्लिनर अवदेवसिंग मुणसी (३५, रा. झारखंड ) आणि चालक असे दोघे जखमी झाले आहेत.
या घटनेशी खबर समजताच कशेडी टॅपचे पोलीस निरीक्षक अनिल घाडीगावकर यांनी सहकार्यासह घटनास्थळी भेट घेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करुन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र चालक शंकरसिंग यास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

च्धाटाव : कोलाडनजीक खांब गावाजवळ मुंबईहून गोव्याकडे जाणारी कार आणि रोह्याकडून मुंबईकडे येणारी मारुती स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

४नागोठणे : ट्रेलरला टेम्पोची धडक लागून टेम्पो पलटी झाल्यामुळे टेम्पोचालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. राजेंद्र विठ्ठल कुंभार (४0) चालकाचे नाव असून तो पाली, सुधागड येथील रहिवासी होता. मुंबई- गोवा महामार्गावर नागोठणे - पेण फाट्यावर हा अपघात घटला.
४वडखळकडे जाणाऱ्या ट्रेलरला (एमएच ४६ एच ६९२) नागोठणेकडे गणपतीच्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोने (एमएच 0६ बी जी ४५४0)धडक दिली. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

४पोलादूर : मुंबई - गोवा महामार्गावर शनिवारी मकबुल महेमुद हमदुले (३८, रा. राजवेल, खेड) हा झायलो गाडीने (एमएच१५ ईबी ४८२३) मुंबईहून खेडकडे निघाला होता.
४डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटून कार सुमारे १५० फूट खोल कशेडी घाटात कोसळल्याने हमदुले याचा मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की पोलादपूर पोलिसांना दरीतील हमदुले यांचे पार्थिव काढण्यात बरीच मेहनत घ्यावी लागली.

Web Title: Two killed and six injured in four different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.