वाहतूक अभ्यासकांच्या ‘बेस्ट’ शिफारशी, सुधारित आराखडा, पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:13 AM2017-08-21T05:13:53+5:302017-08-21T05:14:19+5:30

बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक अभ्यासक पुढे आले आहेत. मुंबईतील या जाणकार मंडळींनी तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला दाखविला आहे. त्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून बेस्ट बचावचा सुधारित आराखडा तयार होणार आहे.

 Transportation experts should take responsibility for 'best' recommendations, revised plan, parent organization | वाहतूक अभ्यासकांच्या ‘बेस्ट’ शिफारशी, सुधारित आराखडा, पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी  

वाहतूक अभ्यासकांच्या ‘बेस्ट’ शिफारशी, सुधारित आराखडा, पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी  

googlenewsNext

मुंबई : बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक अभ्यासक पुढे आले आहेत. मुंबईतील या जाणकार मंडळींनी तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला दाखविला आहे. त्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून बेस्ट बचावचा सुधारित आराखडा तयार होणार आहे.
पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घ्यावी, यासाठी बेस्ट आग्रही आहे. मात्र उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्याने पालिकेला सुमारे सात हजार कोटी रुपयांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्यास पालिका तयार नसल्याचे चित्र असल्याने बेस्टने स्वबळावरच चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये तुटीत चालणाºया वातानुकूलित बस सेवा बंद केल्यानंतर बेस्टने आता वाहतूक अभ्यासकांची मदत घेतली आहे. त्यानुसार वाहतूक अभ्यासकांनी बेस्ट मुख्यालयात शनिवारी दुपारी हजेरी लावून बेस्ट अधिकाºयांना मार्गदर्शन केले. यामध्ये अशोक दातार, सुधीर बदामी, दीपक गोरे, विद्याधर दाते, गिरीश श्रीनिवासन, ए.व्ही. शेणॉय, रवी नायर, अखिल शेख, अमिता भिडे, तृप्ती अमृतवार यांचा समावेश आहे.

या सूचनांवर चर्चा...

बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा.
बेस्टच्या बस आगारांमधील मोकळ्या जागा कॉर्पोरेट संस्थांना भाड्याने देणे.
मोनो, मेट्रोच्या धर्तीवर बेस्ट बसगाड्यांसाठी विशेषकरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष बस मार्गिका उपलब्ध करून देणे.
बेस्टमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत करणे.
बेस्टच्या बसथांब्यावर बस मार्गांचा नकाशा लावणे.
बीआरटीएस यंत्रणा सुरू करणे.
बस आगारांमधील मोकळ्या जागांचा वापर खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी करून उत्पन्न वाढविणे.
बसभाड्याचे सुसूत्रीकरण करणे.

Web Title:  Transportation experts should take responsibility for 'best' recommendations, revised plan, parent organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.