मुंबईत गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेसला ‘नो एन्ट्री’, पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:57 AM2018-11-07T06:57:47+5:302018-11-07T06:58:39+5:30

पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

in the time of the crowd Mail-Express 'No Entry' in Mumbai, Western Railway Proposal | मुंबईत गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेसला ‘नो एन्ट्री’, पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव

मुंबईत गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेसला ‘नो एन्ट्री’, पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव

Next

- महेश चेमटे
मुंबई  - पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास फेºया वाढतील, गाड्यांची गती वाढेल आणि पश्चिम रेल्वेवरील सुमारे ३५ लाख प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी चिन्हे आहेत.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या गर्दीच्या वेळेत १७ मेल-एक्सप्रेस धावतात. सध्या उपनगरी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग आणि त्यावरील वाहतुकीचा विचार करता गर्दीच्या काळात लोकल फेºया वाढवण्यासाठी मेल-एक्स्प्रेसना मुंबईबाहेर थांबा द्यावा, अशी सूचना त्यात आहे. अनेकदा मेल-एक्सप्रेस रखडतात आणि त्यांच्या विलंबाचा फटका लोकल फेºयांना बसतो. त्याही अकारण उशिरा धावतात. काही फेºया रद्द होतात. ते टाळण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
असा प्रस्ताव तयार केल्याच्या माहितीस दुजोरा देताना पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) संजय मिश्रा म्हणाले, ‘गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेºया वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पश्चिम रेल्वे मुख्यालयात पाठवण्यात आला आहे.’
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, मुंबई सेंट्रलवरील ताण कमी करण्यासाठी वांद्रे टर्मिनस बांधून तेथून फेºया सुरूकेल्या. पण त्यामुळे गर्दीच्या वेळेत लोकलच्या वाहतुकीला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे किमान मुंबईतून सुटणाºया मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत योग्य बदल केल्यास अथवा गर्दीच्या काळात येणाºया-जाणाºया गाड्यांच्या वेळेचे नियोजन केल्यास मुंबईकरांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास सुलभ होईल.

फेºया वाढविणे शक्य

सध्या गर्दीच्या वेळेत दर ३-४ मिनिटांना एक लोकल चालवण्यात येते. सध्या पश्चिम रेल्वेवर १०० रेक (गाड्या) असून त्यातील साधारण ९० नियमित वापरात आहेत. १ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या फेºया वाढून त्या एक हजार ३६५ झाल्या. यात हार्बरच्या ११० फेºयांचाही समावेश आहे. नवा प्रस्ताव मंजूर झाल्यास गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेवर फेºया वाढवता येतील.

एसी लोकललाही होणार फायदा
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात जानेवारीत आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल होईल. गेल्यावर्षी एसी लोकलसाठी साध्या फेºया रद्द करण्याची वेळ आली होती. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या गर्दीच्या वेळेत मुंबईबाहेर रोखल्यास एसी लोकलच्या फेºयाही वाढवण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.
 

Web Title: in the time of the crowd Mail-Express 'No Entry' in Mumbai, Western Railway Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.