मुंबई : तृतीयपंथीय वर्गासाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे. रेल्वे बोर्डाने तृतीयपंथीयांना हक्काचे स्थान देण्याकरिता ‘आहे. पश्चिम रेल्वेला हे पत्र प्राप्त झाले असून, आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’ - ‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी आद्याक्षराचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीयांच्या हक्काबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचा रेल्वे मंत्रालयाने आढावा घेत तो अंमलबजावणीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला. त्यानुसार तिकीट आरक्षण करताना स्त्री-पुरुष या प्रवर्गासह तृतीयपंथीय प्रवर्गाचा समावेश करावा. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिमने (सीआरआयएस) देखील सॉफ्टवेअरमध्ये टी या आद्याक्षराचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिमला (पीआरएस)देखील आॅनलाइन आरक्षण प्रक्रियेत ‘टी’ या आद्याक्षराचा समावेश करण्यास सांगितले आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. देशात तब्बल ४ लाख ९० हजारांपेक्षा जास्त तृतीयपंथी असून, या वर्गात साक्षरतेचे प्रमाण ५६.०७ टक्के आहे. राज्यात ४० हजार ८९१ तृतीयपंथीय असून, साक्षरतेचे प्रमाण ६७.५७ टक्के आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.