शिबिरात रंगले विद्यार्थी

By admin | Published: January 24, 2017 06:22 AM2017-01-24T06:22:55+5:302017-01-24T06:22:55+5:30

दहावीनंतर महाविद्यालयात जाणे यात जशी उत्सुकता असते, तसेच प्राथमिक वर्गातून माध्यमिक वर्गात प्रवेश करणे हे स्थित्यंतरसुद्धा

Students in the camp | शिबिरात रंगले विद्यार्थी

शिबिरात रंगले विद्यार्थी

Next

मुंबई : दहावीनंतर महाविद्यालयात जाणे यात जशी उत्सुकता असते, तसेच प्राथमिक वर्गातून माध्यमिक वर्गात प्रवेश करणे हे स्थित्यंतरसुद्धा महत्त्वाचे असते. याची दखल फारशी कुणी घेत नसले; तरी छबिलदास शाळेने मात्र चौथीतल्या विद्यार्थ्यांचे एकदिवसीय निवासी शिबिर घेऊन या मुलांचे वरच्या इयत्तेतले स्थित्यंतर संस्मरणीय केले.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाणारी इयत्ता ४थीची मुले या शिबिरात मनसोक्त रंगली. एक पूर्ण दिवस आणि रात्र या मुलांनी शाळेच्या वातावणात घालवली. अनेक विषयांच्या तज्ज्ञांनी यात मुलांना मार्गदर्शन केले. खेळ, प्रश्नमंजुषा, पपेट्स, कथाकथन अशा विविध उपक्रमांचा यात समावेश होता. वर्षभर मुले शाळेत अभ्यासात पूर्णत: अडकलेली असतात; परंतु अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमांमुळे मुलांची शाळेविषयीची ओढ अधिक वाढते, हे लक्षात घेऊन छबिलदास लल्लुभाई प्राथमिक शाळेने ही संकल्पना प्रत्यक्षात आणत मुलांना स्वावलंबनाचे महत्त्वही पटवून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Students in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.