आरे वसाहतीत मेट्रो कारशेडला रहिवाशांचा जोरदार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:43 AM2018-10-11T02:43:31+5:302018-10-11T02:43:52+5:30

एकीकडे आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत सुनावणी होत असताना, या प्रकल्पात बाधित झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे, असा आक्षेप घेत महापालिकेमार्फत सुरू असलेली सुनावणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.

 Strong opposition to residents of Aarey Colhate Metro Carshad | आरे वसाहतीत मेट्रो कारशेडला रहिवाशांचा जोरदार विरोध

आरे वसाहतीत मेट्रो कारशेडला रहिवाशांचा जोरदार विरोध

Next

मुंबई : एकीकडे आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत सुनावणी होत असताना, या प्रकल्पात बाधित झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे, असा आक्षेप घेत महापालिकेमार्फत सुरू असलेली सुनावणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. मनसे आणि आपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून ही बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुनावणीच्या पहिल्या दिवशी ही बैठक वादळी ठरली आहे. ही बैठक वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणीसंग्रहालयाच्या इमारतीत पार पडली.
गोरेगाव येथील आरे वसाहतीत मेट्रो प्रकल्प-३च्या कारशेडसाठी तब्बल २ हजार ७०२ वृक्षांची कत्तल होणार आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून महापालिकेकडे तब्बल ३३ हजार सूचना व हरकती आल्या आहेत. यावर भायखळा येथील राणीबागेतील उद्यान विभागाच्या कार्यालयात बुधवारी पहिली सुनावणी झाली. यात मेट्रो आणि महापालिका अधिकारी, मनसे, आप कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या वेळी मनसे आणि आपकडून आधिकाºयांना घेराव घालण्यात आला. सुनावणी सुरू होण्यापूर्वीच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आधीच काही झाडे तोडल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले.

ही तर निव्वळ धूळफेक
वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या इमारतीत पार पडलेल्या बैठकीत रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी नागरिकांच्या हरकती व सूचना ऐकणे ही केवळ धूळफेक असून झाडे तोडणाºया अधिकाºयावर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी उपस्थितांनी केली. तर मनसे आणि आपने आता यापुढे अधिकाºयांना आरे वसाहतीत पाय ठेवू देणार नाही, असा दम रहिवाशांनी भरला.

Web Title:  Strong opposition to residents of Aarey Colhate Metro Carshad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो